हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संपात सहभाग

हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांचा बेमुदत संपात सहभाग

धुळे Dhule। प्रतिनिधी

वैद्यकीय पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची (medical postgraduate courses) शैक्षणिक फी माफ व्हावी, (Tuition fee waived) कोविड प्रोत्साहन भत्ता (Covid incentive allowance) मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी राज्यातील निवासी डॉक्टरांनी (resident doctors) आजपासून बेमुदत काम बंद आंदोलन (Indefinite work stop movement) सुरू केले आहे. त्यात भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (Hire Medical College) डॉक्टर सहभागी (Participants) झाले आहेत. यावेळी निदर्शने करण्यात आली. प्रसंगी निवासी डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांचे फलकही हाती घेतले होते.

याबाबत सेट्रल मार्ड संघटनेने दिलेल्या स्मरण पत्रात म्हटले आहे की, कोविडच्या कठीण संकटाला महाराष्ट्राने धैर्याने व सक्षमपणे तोंड दिले. त्यामध्ये निवासी डॉक्टरांनी अत्यंत मोलाची जबाबदारी पार पाडली. आपले कुटुंब, वैयक्तिक आयुष्य, वैद्यकीय शिक्षण या सर्व गोष्टींना दूर ठेऊन निवासी डॉक्टरांनी ही लढाई लढण्यासाठी प्राण पणाला लावले. अनेक निवासी डॉक्टरांना या लढाईत कोविड संसर्ग झाला.

तरीही कोणीही कर्तव्यात कसूर केला नाही. कोविडचा प्रभाव वैद्यकीय शिक्षण व प्रशिक्षण यावर ही झाला. या बाबींचा विचार करता मागील जुन व ऑगस्ट महिन्यात झालेल्या 2 बैठकींमध्ये मंत्री महोदयांनी वैद्यकीय पदव्यूत्तर अभ्यासक्रमांची शैक्षणिक फी माफी, प्रोत्साहन भत्ता, बीएमसी कॉलेजच्या निवासी डॉक्टरांचा टीडीएसचा मुद्दा व राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्टेल संबंधित समस्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन सेंट्रल मार्ड संघटनेच्या शिष्टमंडळाला दिले होते.

मात्र महिने उलटून गेला तरी यावर निर्णय झाला नसल्याने सरकार आपल्या रास्त मागण्याविषयी उदासीन असल्याची भावना राज्यभरातील निवासी डॉक्टर्समध्ये पसरली आहे. याबाबत स्मरणपत्र देवूनही निर्णय झाला नाही.

त्यामुळे आजपासुन निवासी डॉक्टरांनी बेमुदत राज्यस्तरीय संप सुरू केला आहे. त्यात हिरे महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी देखील पाठींबा दिला आहे. राज्यव्यापी संपात त्यांनी सहभाग घेतला आहे.

Related Stories

No stories found.