लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र,आरोग्य अधिकार्‍यांसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

 लसीकरणाचे बनावट प्रमाणपत्र,आरोग्य अधिकार्‍यांसह चौघांच्या पोलीस कोठडीत वाढ

धुळे ।Dhule प्रतिनिधी

महापालिकेतील (Municipal Corporation) बोगस लसीकरण प्रमाणपत्र ( vaccination certificate) प्रकरणी महापालिकेचे आरोग्याधिकारी (Health Officer) डॉ. महेश मोरे, डॉ.प्रशांत पाटील, ब्रदर उमेश पाटील व अमोल पाथरे या चौघांच्या पोलीस कोठडीत (Police cell) दोन दिवस न्यायालयाने (Court) वाढ केली आहे.

या प्रकरणाची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू असून त्यात आणखी काही डॉक्टर व परिचारिका रडारवर आल्या आहेत. सहाय्यक आयुक्त नारायण सोनार यांच्या फिर्यादीवरून याप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला. शहरातील मोहाडी शिवारातील केंद्रावरील लसीकरणाचा युजर आयडी व पासवर्ड अज्ञात व्यक्तीने चोरून तब्बल तीन हजार 191 जणांना कोरोना लस न घेताच लस घेतल्याचे बोगस प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. याव्दारे महापालिका व शासनाची फसवणुक करण्यात आली.

मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. महेश मोरे, डॉ. प्रशांत पाटील, ब्रदर उमेश पाटील व आरोग्य विभागाचा कंत्राटी कर्मचारी अमोल पाथरे या चौघांना न्यायालयाने त्यांना दि. 17 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. आज कोठडीची मुदत संपल्याने चौघांना न्यायालयात हजर केले असता चौघांच्या कोठडीत दोन दिवस वाढ करण्यात आली.

Related Stories

No stories found.