
पिंपळनेर - Pimpalner
आरोग्य शिबिरातून (Health camp) कुपोषणाची समस्या थांबवावी. याबरोबर अशा शिबिरातून आजाराचे निदान करून घेतले पाहिजे. शारीरिक व्याधींवर तज्ञ डॉक्टरांचा (Doctor) सल्ला घेत शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन खासदार डॉ.हिना गावीत (MP Dr. Hina Gavit) यांनी केले.
येथील ग्रामीण रुग्णालयात (Hospital) राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत मोफत वैद्यकीय व (Dentistry) दंत शल्य चिकित्सक शिबीर दि.११ ते १४ चार दिवस होत असून शिबिराचे उदघाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे, जि.प. सदस्या सुधामती गांगुर्डे, जि. प.सदस्य धीरज अहिरे, जि.प.सदस्य विजय ठाकरे, सभापती प्रतिभा सूर्यवंशी,प.स.सदस्य रोशनी पगारे, प.स.सदस्य देवेंद्र गांगुर्डे, माजी.जि. प.सदस्य विलास बिरारीस,इंजि.मोहन सूर्यवंशी, सरपंच देविदास सोनवणे, उपसरपंच विजय गांगुर्डे, माजी प.स.सदस्य उत्पल नांद्रे, पंकज सूर्यवंशी, गणपत चौरे, भटू गांगुर्डे, धुडकू गांगुर्डे, वैद्यकीय अधिकारी राकेश मोहाने, आयुष विभागाचे डॉ.भूषण जोशी आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक जिल्हा शल्यचिकित्सक कांचन वानेरे यांनी केले. यावेळी त्यांनी आरोग्याची काळजी घेत महिला व पुरुषांनी आरोग्याशी तपासणी करून घेतली पाहिजे असे सांगितले.
या शिबिरात कान, नाक, घसा तज्ञ, भिषक तज्ञ, बालरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, क्ष- किरण तज्ञ, दंत तज्ञ शल्यचिकित्सक, सर्जन, नेत्ररोग तज्ञ, भुल तज्ञ यात वैदयकिय अधिकारी डॉ. संजय एम.शिंदे, डॉ. अभिषेक अग्रवाल, डॉ.जितेश चौरे, डॉ. मोसीन मुल्ला, डॉ.प्रणिता चोले, डॉ. अभिषेक पाटील डॉ. अभय शिनकर, डॉ.विशाल पाटील, डॉ.गितांजली सोनवणे, डॉ. अलिम अन्सारी, डॉ.गोपाल अटलानी, डॉ.अतुल देवरे, डॉ. विवेक जाधव, डॉ. रविन्द्र सोनवणे हे आरोग्य शिबिरात सेवा देत होते.
यावेळी ग्रामीण रुग्णालयात बसवण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट चे उदघाटन खासदार डॉ.हिना गावीत यांच्या हस्ते करण्यात आले. आरोग्यशिबिरात पहिल्या दिवशी विविध आजारांच्या तपासणीसाठी गर्दी झाली होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.एस. कोठावदे यांनी केले. तर आभार वैद्यकीय अधिकारी राकेश मोहाने यांनी मानले.