चार महिन्याच्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास असमर्थता

शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयातील प्रकार, नातेवाईक संतप्त
चार महिन्याच्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास असमर्थता

शिंदखेडा (Shindkheda) । प्रतिनिधी

आदिवासी महिला (Tribal women) चार महिन्याची गरोदर (pregnant) असतांना तिच्यावर उपचार (Treatment) करण्यास शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयाने (rural hospital) असमर्थता (Disability) दाखवून जिल्हा रुग्णालयात (district hospital) उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्या महिलेला ग्रामीण रुग्णालयाने रुग्णवाहिकाही (Ambulance) उपलब्ध करुन दिली नाही.

शिंदखेडा येथील बंगला भिलाटीत राहणारी यशोदा अर्जुन भिल ही चार महिन्याची गरोदर आहे. या महिलेला रक्तस्त्राव होत असल्याने दि. 9 नोव्हेंबर रोजी रात्री तिला शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रात्री 11 वाजेच्या सुमारास तिला असह्य वेदना होवू लागल्या. त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी रात्री ड्युटीवर असलेले डॉ. कुंदन वाघ यांना तपासण्याची विनंती केली. परंतू त्यांनी वेळेवर कोणताही उपचार केला नाही. अशी तक्रार त्या महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. त्या महिलेला उपचारार्थ धुळे येथे नेण्याचा सल्ला डॉ. वाघ यांनी दिला. त्यामुळे त्या महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेची मागणी केली मात्र चालक नसल्याचे कारण सांगण्यात आले.

रुग्णालय अधीक्षक डॉ. भूषण काटे यांनाही याबाबत माहिती देण्यात आली. मात्र त्यांच्याकडून देखील कोणतेही सहकार्य मिळाले नाही.

या प्रकारामुळे रात्री साडेबारा वाजेपर्यंत सदर महिलेला उपचारा अभावी दवाखान्यात पडून राहावे लागले. त्यानंतर उशिराने 108 नंबरला फोन केल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध झाली. त्यानंतर त्या महिलेला धुळे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

ग्रामीण रुग्णालयात महिलेला देण्यात आलेल्या वागणूकीबाबत आदिवासी विकास मंचचे अध्यक्ष दीपक अहिरे, बापूजी फुले, श्याम गंगाराम मालचे, किरण चित्ते यांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून संबंधित डॉक्टरची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com