पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

पिकअपच्या धडकेत
दुचाकीस्वार ठार

धुळे Dhule।। प्रतिनिधी

भरधाव पिकअपने (Pickup) दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार (two-wheeler) तरूण (young man) जागीच ठार (killed) झाला. काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. याबाबत शिरपूर शहर पोलिसात (Shirpur city police) नोंद झाली आहे.

चंदु उदयसिंग पावरा (वय 31 रा. टेंभेपाडा ता. शिरपूर) असे मयत तरूणाचे नाव आहे. तो दुचाकीने निमझरी रोडने जात होता. त्यादरम्यान त्याला अज्ञात पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात गंभीर जखमी होवून त्याचा मृत्यू झाला. त्याला 108 क्रमांकाच्या रूग्णवाहिकेव्दारे वडील उदयसिंग पावरा यांनी शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. वार्डबॉय नितेश गवळी याने शहर पोलिसात दिलेल्या माहितीवरून नोंद करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com