महिलेची फसवणूक, दोघा नातवांसह तिघांवर गुन्हा दाखल

प्लॉट परस्पर नावावर, दागिन्यांसह रक्कम घेतली काढून
महिलेची फसवणूक, दोघा नातवांसह तिघांवर गुन्हा दाखल

धुळे । Dhule । प्रतिनिधी

आजोबांच्या नावावर (name of grandfather) असलेला प्लॉट (plot) परस्पर नावावर (each other's name)करून घेत आजीजवळील दागिने व रोख रक्कमही (Jewelry and cash) दोघा नातवांनी काढून (Removed by grandchildren) घेतली. यासाठी त्यांना नातवाच्या सासर्‍यानेही मदत केली. याप्रकरणी तिघांवर देवपूर पोलिसात गुन्हा (crime) दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शांताबाई सिताराम पाटील (वय 75 रा. 35 प्रभात नगर, देवपूर, धुळे) या वृध्देने देवपूर पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, दि. 17 नोव्हेंबर 2015 च्या दहा महिन्यांपुर्वी तसेच 12 सप्टेंबर 2021 नंतर 15 दिवसांनी कैलास रावसाहेब पाटील (रा.पुणे), भाऊसाहेब रावसाहेब पाटील (रा.अंजनविहीर, ता.भडगाव, जि.जळगाव) या दोघांसह कैलासचे सासरे अशोक माधवराव पाटील (रा.दत्तमंदिर, देवपूर, धुळे) या तिघांनी शांताबाई यांचा विश्वासघात केला.

सिताराम पाटील यांच्या नावावर असलेला देवपूरातील 19 लाख 15 हजार रूपये किंमतीचा प्लॉट परस्पर खरेदी करून घेतला. तसेच 2 लाख 5 हजार रूपये किंमतीचे पाच तोळ्याच्या पाटल्या, चार तोळ्याची पोत व दीड तोळ्याचे डोंगल असे दागिने देखील ठेवून घेतले. याबरोबच वृध्देच्या बँक खात्यात असलेले दोन लाख रूपये वेळोवेळी काढून घेतले. याप्रकरणी वरील तिघांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक आर.जी.माळी करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com