महापालिका स्थायीच्या सभेत सदस्यांचा प्रशासनावर रोष

महापालिका स्थायीच्या सभेत सदस्यांचा प्रशासनावर रोष

धुळे Dhule । प्रतिनिधी

महापालिकेच्या (Municipal Corporation) स्थायी समितीच्या (Standing Committee) सभेत सदस्यांनी (Member) प्रशासनाच्या (administration) बेजबाबदार कारभारावर (irresponsible conduct) ताशेरे (Tashere) ओढले त्यामुळे प्रशासनाची बोलती बंद झाली. दरवेळी आश्वासन दिले जाते मात्र प्रभागात कामे होत नाहीत,शासनाला प्रस्ताव पाठवला आहे अशी उत्तरे दिली जातात असा संताप सदस्यांनी व्यक्त केला.

स्थायी समितीची सभा आज सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, नगरसचिव मनोज वाघ, संजय जाधव, किरण अहिरराव, नागसेन बोरसे, साबीर खान, नरेश चौधरी, प्रतिभा चौधरी, किरण कुलेवार, नाजियाबानो पठाण, अब्दुल अन्सारी आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सभेत विषय पत्रिकेवर एकूण सात विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते. नगरसेवक किरण अहिरराव यांनी त्यांच्या प्रभाग क्र.6 मधील शंभर कॉलन्यामध्ये चिखल आहे. रस्त्यांवर चालता येत नाही. शासनाला प्रस्ताव पाठवला आहे, निधी येईल अशी उत्तरे दिली जातात. 200-500 कोटी येतील तेव्हा येतील,तोपर्यंत मुरुम तरी टाका लोकांना घराबाहेर पडू द्या, दिवे लावा असे त्यांनी सांगितले.

त्यावर अभियंता शिंदे यांंनी कॉलन्यांच्या विकासाला निधी मिळावा यासाठी पाठपुरावा केला होता.परंतु अनुदान मिळालेले नाही. आता नव्याने 122 कोटीचा प्रस्ताव तयार केला आहे. तांत्रिक मंजुरी बाकी आहे. अर्थसंकल्पात मुरुमासाठी तरतुद नाही,त्यामुळे 150-200 कॉलन्यांमध्ये मुरूम टाकणे शक्य नाही. असे त्यांनी सांगितले.

आयुक्तांनी देखील बजेटमध्ये या प्रकरणी तरतुद करावी लागेल. बांधकाम विभागाकडून प्रस्ताव,निविदा या प्रक्रिया कराव्या लागतील. यामुळे अहिरराव संतापले. म्हणजे काहीच होणार नाही शंभर कॉलन्या तुडूंब भरल्या आहेत. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी तिथं फिरावं म्हणजे त्यांना कळेल. तुमचे प्रस्ताव, निविदा यामध्ये सर्व पावसाळा निघुन जाईल. असे त्यांनी सांगितले.

सभापती शीतल नवले यांनी धोरण निश्चित करुन हा प्रश्न मार्गी लावू असे सांगितले. नगरसेविका प्रतिभा चौधरी यांनी 30 जुनच्या बैठकीत दुषित पाणीपुरवठा बाबत तक्रार केली होती.हा विषय गंभिर असतांना अंमलबजावणी होत नाही, नकाणेे रोेड, मोचीवाडा ते इंदिरा गार्डन रस्त्यावरील तात्पुरते खड्डे बुजवा अशी मागणी त्यांनी केली.

आम्ही तेे बोलतो,आयुक्त फक्त ऐकून घेतात कारवाई काहीच होत नाही, प्रशासन अकार्यक्षम आहे. त्यामुळे अशा प्रशासनाचा मी धिक्कार करते असा संताप प्रतिभा चौधरी यांनी व्यक्त केला. वर्षभरानंतर निवडणुका आहेत. आयुक्तांनी सांगितले की, खड्डे बुजविण्याचे काम एमजीपीचे आहे. सभापती नवले यांनी खड्डे भरण्याच्या सुचना एमजीपीला दिल्या आहेेत. झाडांचा विस्तार कमी करणे हे महापालिकेचे नव्हेतर वीज कंपनीचे काम आहेे, त्याबाबत आपण त्यांच्याशी बोलू असे त्यांनी सांगितले.

हर्ष रेलन म्हणाले की, स्थायीच्या सभेत तेच ते विषय आम्ही किती वेळा बोलावे, प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नाही, वर्षभर तेच ते बोलत असल्याने आमचे जनतेत हसू होते. नगरसेवक निधीची फाईल 2018 पासून अडकली आहे, त्याचे काय झाले असा सवालही त्यांनी विचारला.

आर्थिक आणि महत्वाच्या विषयासाठी चार-पाच दिवस आधी अजेंडा द्यावा,त्यामुळे अभ्यासाठी वेळ मिळेेल. हे दोन विषय स्थगित ठेवावे अशी त्यांनी मागणी केली.नागसेन बोरसेंनी देखील या विषयावर आपले मत मांडले.तसेच प्रभाग क्र.7 मध्ये नदी किनारचे महापालिकेचे तीन एकर पैकी दोन एकर जागा अतिक्रमण धारकांनी गिळंकृत केली आहे. गेल्या चार महिन्यात या भागात अनेक पत्र्याचे शेड उभे राहिले आहेत,अतिक्रमण विभाग करतो काय? असा सवाल त्यांनी विचारला.

सभापती नवले यांनी आजच अतिक्रमण विभागाने या अतिक्रमण धारकाना सुचना देवून तीन दिवसात अतिक्रमण हटवावे आदेश दिले आहेत.सभेत 3 विषय तहकुब ठेवण्यात आले.

किरण कुलेवार यांनी डेंग्यु मलेरिया रोखण्यासाठी अ‍ॅबेटींग,फवारणीची मागणी केली. तसेच जनजागृती करावी असेही त्या म्हणाल्या. कुत्र्यांचे निर्बिजीकरण करुन प्रश्न सुटणार नाही, निर्बिजीकरण केले म्हणजे ते चावा घेणार नाहीत, निर्बिजीकरणाच्या ठेक्यामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे हा विषय स्थगित ठेवण्याची त्यांनी मागणी केली. सभापतींनी हा विषय स्थगित केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com