पाचवीच्या विद्यार्थ्याची आश्रमशाळेतच आत्महत्या

पाचवीच्या विद्यार्थ्याची आश्रमशाळेतच आत्महत्या

पिंपळनेर | वार्ताहर

आंमळी ता. साक्री येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्याने शाळेच्या आवारात बाथरूम मध्ये गळफास घेवून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

अनिल कमाशा पाडवी रा. त्रिशूल असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. तो आंमळी ता. साक्री येथील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत इयत्ता पाचवीत शिकत होता. त्याने काल दि.३० सप्टेबर रोजी सायंकाळी ७.३० ते ८ दरम्यान शाळेच्या आवारात बाथरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

याबाबत पालकांना किंवा पोलिसांना माहिती न देता मृतदेह परस्पर ग्रामीण रुग्णालय साक्री येथे दाखल केला. व नंतर धुळे सिव्हिल हॉॅस्पिटल मध्ये हलविला. मयत विद्यार्थ्याला आई , वडील नाहीत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com