साक्रीत सैनिकांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

स्वातंत्र्य दिनी मुख्याधिकार्‍यांची घोषणा
साक्रीत सैनिकांची घरपट्टी, पाणीपट्टी माफ

साक्री Sakri । प्रतिनिधी

येथील नगरपंचायतीने (Nagar Panchayat) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Amrit Mahotsav of Freedom) मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त शहरातील सेवानिवृत्त सैनिकांचा (retired soldiers) सपत्नीक सत्कार (felicitation) करण्यात आला. तसेच सर्व सैनिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ (house rent, water rent waived) करण्यात आल्याची घोषणा मुख्याधिकारी (Chief Officer) देवेंद्रसिंग परदेशी यांनी केली. या निर्णयाचा सर्वांनी स्वागत केले.

नगरपंचायतीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला नगराध्यक्षा जयश्री पवार, उपनगराध्यक्ष बापूसाहेब गीते, पाणीपुरवठा सभापती रेखा सोनवणे, बांधकाम सभापती अ‍ॅड. गजेंद्र भोसले, आरोग्य सभापती मनीषा देसले, महिला बालकल्याण सभापती जयश्री पगारिया, संगीता भावसार, नगरसेविक उज्वला भोसले, उषा पवार, प्रवीण निकुंभ, दीपक वाघ, अ‍ॅड. पुनम काकुस्ते, नगरसेवक पंकज मराठे, राहुल भोसले, याकुब पठाण, रमेश सरग, कार्यालयीन अधिक्षक चौधरी आदी उपस्थित होते

स्वातंत्र्य दिनी हर घर तिरंगा या मोहिमे सोबत इतर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात सेवानिवृत्त जवानांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित जवानांनी सेवा काळातील थरारक अनुभव कथन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबा सोनवणे व अनिल पवार यांनी केले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com