अवैध सावकारी विरोधात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये

चौघांवर गुन्हा, पिळवणूक होत असल्यास तक्रार करा- एसपी
अवैध सावकारी विरोधात पोलिस अ‍ॅक्शन मोडमध्ये

धुळे Dhule। प्रतिनिधी

येथील अवैध सावकारीविरोधात (Illegal lending) पोलिस (police) अ‍ॅक्शनमोडमध्ये आले आहेत. व्याजासाठी अपहरण करून मारहाण (Abduction) केल्याप्रकरणी चौंघावर आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे अवैध सावकारांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान ज्यांचे अवैध सावकारांकडून आर्थिक शोषण (Economic exploitation) अथवा पिळवणूक झाली असेल त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे (Economic Crimes Branch) तक्रार करावी, असे आवाहन पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी केले आहे. दरम्यान पोलिसांच्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध सावकारीचा प्रश्न चर्चेत आला आहे.

खासगी अवैध सावकारी (Illegal lending) करणार्‍यांनी शहरासह जिल्ह्यात बस्तान बसविले आहे. गरजू लोकांना शोधून त्यांना अव्वाच्या- सव्वा व्याज दराने कर्ज वाटप (Debt allocation) केले जाते. कर्जासाठी तारण म्हणून खासगी सावकार कर्जदात्यांकडून त्याचे घर, शेती, प्लॉट, वाहने आपल्या नावावर करून घेतात. अशा सावकारांची त्या परिसरात दहशत असल्याने त्यांच्याविरुद्ध कोणीही बोलत नाही

. यामुळे अशा सावकारांचे धाडस वाढते. याबरोबरच ग्रामीण भागात अवैध सावकारी चांगलीच वाढली आहे. शेती, सिंचन, मुला-मुलींचे लग्न, पाल्यांचे शिक्षण, घर बांधकाम, शेती अवजारांसाठी पैशाची गरज लागते. यासाठी सावकार दागिने, शेती, प्लॉट व इतर वस्तू गहाण ठेवून 25 ते 30 टक्के दराने व्याज शेतकरी, शेजमजुरांना कर्ज देतात.

परंतु, ते वसुली करताना मोठ्या प्रमाणात पिळवणूक (Economic exploitation) करतात. एक महिन्याचे व्याज थकले तर व्याजावर चक्रवाढ व्याज आणि दर दिवसाला दंड आकाराला जातो. पन्नास हजार घेतलेल्या कर्जाचे दीड-दोन वर्षांत एक लाख रुपये व्याज भरूनही मुद्दल तशीच राहते. कर्ज देऊन नंतर धमकावणे, मारहाण करणे, पिळवूणक करणे, मालमत्ता ताब्यात घेण्याचे प्रकार आजही घडत आहेत.दरम्यान अशा अवैध सावकारीविरोधात काल पोलिसांनी केलेल्या कारवाईने (Action) जनतेने स्वागत केले.

Related Stories

No stories found.