अवघ्या नऊ दिवसात धुळ्यात सराफ दुकानदाराला ७१ लाखात गंडा

राजस्थानातील दोघा कर्मचार्‍यांनीच केला विश्‍वासघात, गुन्हा दाखल
अवघ्या नऊ दिवसात धुळ्यात सराफ दुकानदाराला ७१ लाखात गंडा

धुळे |Dhule | प्रतिनिधी

शहरातील आग्रा रोडवरील सराफ दुकानदाराला (goldsmith) दुकानातील दोघा राजस्थानच्या (Rajasthan) कर्मचार्‍यांनीच (employees) अवघ्या नऊ दिवसातच तब्बल ७१ लाख ६४ हजारात गंडविल्याची (Messed up) धक्कादायक घटना आज समोर आली. दोघांनी वरील रक्कमेचे सोने-चांदीचे दागिने (Gold-silver jewelry) परस्पर काढून घेवून अपहार केला. याप्रकरणी दोघांवर आझादनगर पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत व्यापारी प्रकाश जोरावरमल चौधरी (Trader Prakash Joravarmal Chaudhary) (वय ५३ रा. ५ बी नित्यानंद नगर, नटराज टॉकीजच्या मागे, धुळे) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार त्यांचे जुन्या आग्रा रोडवरील स्वर्ण पॅलेस (Golden Palace) नावाचे दुकान आहे. दि. १ ते ९ एप्रिल दरम्यान दुकानात सोने विभागाशी स्टॉकचे देखरेख करणारे शांतीलाल हमीराम कलबी (रा. मंडार ता. रेवदर जि. सिरोही, राजस्थान) व त्याचा साथीदार किशोर नटवरलाल कोली (रा. पिथापुरा त रेवदर जि. सिरोही, राजस्थान) यांनी मालकाचा विश्‍वासघात (Betrayal) केला. त्यांनी दिलेेल्या जबाबदारीचा गैरवापर करून दुकानातील तब्बल ७१ लाख ६४ हजार ४०० रूपये किंमतीचेे सोने व चांदीचे दागिने (Gold-silver jewelry) परस्पर काढून घेवून अपहार (appropriation) केला. दि. ९ एप्रिल रोजी सकाळी हा प्रकार व्यापारी प्रकाश चौधरी व त्याचा भाऊ सरदारमल चौधरी यांच्या लक्षात आला. याप्रकरणी राजस्थानच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोघांची कबूली, एकाची आत्महत्या

सोने-चांदीच्या स्टॉकमध्ये अपहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यापारी चौधरी बंधूंना मोठा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी दुकानातील चांदी खात्याचा हिशोब व व्यवहार बघणारा हितेश दिनेशकुमार जोशी व सोन्याचा स्टॉक बघणारा शांतीलाल कलबी या दोघांची चौकशी (Inquiry) केली. तेव्हा त्यांनी परस्पर दागिने काढून घेतल्याची कबुली दिली. तसेच यात किशोर कोली याचाही सहभाग असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांनी सात दिवसात तुमचा संपुर्ण माल परत आणून देतो, असे सांगितले. मात्र दि. १३ एप्रिल रोजी हितेश जोशी (Hitesh Joshi) याने आत्महत्या (Suicide) केली. तर तर शांतीलाल कलबी हा तेव्हा पासून फरार झाला आहे.

Related Stories

No stories found.