पुढील काळात 3 लाख पर्यंतचे कर्ज जिल्हा बँक बिनव्याजी देणार

आ. जयकुमार रावल, शिंदखेडा येथे बँकेच्या मतदारांचा मेळावा
पुढील काळात 3 लाख पर्यंतचे कर्ज जिल्हा बँक बिनव्याजी देणार

दोंडाईचा । Dondaicha । प्रतिनिधी

धुळे आणि नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (Dhule and Nandurbar District Central Co-operative Banks) अनेक अडचणींना सामोरे जात आता ऑडिट वर्ग ब + मिळविला असून बँकेला गेल्या वर्षी दहा कोटींचा नफा (Ten crore profit) झालेला आहे. लवकरच नवीन संचालक मंडळाने कार्यभार घेतल्यानंतर तीन लाख रूपये पर्यंतचे बिनव्याजी कर्ज (Interest free loan) उपलब्ध करून देण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. अशी माहिती आ जयकुमार रावल (MLA Jayakumar Rawal) यांनी दिली.

शिंदखेडा येथील बिजसनी मंगल कार्यलायात आज जिल्हा बँकेच्या मतदारांचा मेळावा घेण्यात आला. त्यावेळी आ. रावल हे बोलत होते.

अध्यक्षस्थानी जि. प. चे माजी अध्यक्ष शिवाजीराव दहिते हे होते. तर बँकेचे चेअरमन राजवर्धन कदमबांडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, जि. प. चे अध्यक्ष तुषार रंधे आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना आ. रावल म्हणाले की, जिल्हा बँक आणि शिंदखेडा तालुक्याचे एक नाते आहे. ही बँक सहकारमहर्षी दादासाहेब रावल यांनी स्थापन केली होती. बँकेच्या पहिल्या संचालक मंडळात शिंदखेडा तालुक्यातील चेअरमन, व्हा. चेअरमन आणि कमखेडा गावातील संचालक होते. बँकेच्या जडणघडणमध्ये शिंदखेडा तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे योग्य व्यक्ती या ठिकाणी निवडून गेला पाहिजे. वास्तविक व्यासपीठावर काँग्रेससह सर्वच पक्षाचे नेते असल्याने समोर विरोधक नाहीत म्हणून निवडणूक फार सोपी असली तरी गाफील राहू चालणार नाही. लवकरच बँक शेतकर्‍यांना तीन लाख पर्यंतचे कर्ज बिनव्याजी देणार असल्याचे आ रावल यांनी सांगितले.

यावेळी शामकांत सनेर, नारायण पाटील, सुरेश पाटील, तुषार रंधे, शिवाजीराव दहिते, राजवर्धन कदमबांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी राजेंद्र देसले, महंत दर्यावगिर, शिलाबाई विजय पाटील, सुरेश पाटील, आदी शेतकरी पॅनलचे उमेदवार उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. एस. गिरासे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com