
धुळे । Dhule । प्रतिनिधी
सुरत-नागपूर महामार्गावरील (Surat-Nagpur Highway) तालुक्यातील अजंग गाव शिवारात अज्ञात वाहनाने (unknown vehicle) दिलेल्या धडकेत पादचारी ठार (Pedestrian killed) झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.
शिवदास रतन कुर्हाडे (रा. वरखेडी कुंडाणे ता. धुळे) असे मयताचे नाव आहे. तो रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जात होता. त्यादरम्यान अजंग शिवारात पुलाचे काम चालु असलेल्या ठिकाणी त्याला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यात डोक्याला व पायाला गंभीर दुखापत होवून त्याचा मृत्यू झाला. याबाबत सुरेश रमेश कुर्हाडे याच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात अज्ञात वाहनावरील चालकावर गुन्हा (crime) दाखल झाला आहे. तपास पोहेकाँ खैरनार करीत आहेत.