जेठणीसोबत अनैतिक संबंध, पतीसह 6 जणांवर गुन्हा

जेठणीसोबत अनैतिक संबंध, पतीसह 6 जणांवर गुन्हा

धुळे ।Dhule। प्रतिनिधी

मुलबाळ होत (no child) नाही म्हणून विवाहितेचा छळ (Marital harassment) करत पतीने (Husband') जेठाणी (brother-in-law) सोबत अनैतिक संबंध ठेवले म्हणून पती, जेठाणीसह सहा जणांवर नरडाणा पोलिसात (Nardana police) गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

याबाबत अजंदे (ता. शिंदखेडा) येथे राहणार्‍या वनिता अमोल परदेशी (वय 33) या विवाहितेने नरडाणा पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लग्न झाल्यापासून तीन वर्षानंतर मुलबाळ होत नाही व माहेरून व्यवसायासाठी 50 हजार रूपये आणावे म्हणून तिला सासरी वेळोवेळी शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. तिचा मानसिक छळ केला. फारकत देत नाही म्हणून तिच्या अंगावरील दागिने काढून घेवून घरातून हाकलून दिले.

तसेच तिच्या पतीने जेठणीसोबत अनैतिक संबंध ठेवले म्हणून पती अमोल भगवान परदेशी तसेच सासरे भगवान संतोष परदेशी, सासु अलकाबाई भगवान परदेशी, मयुर भगवान परदेशी, दिराणी रेखा मयुर परदेशी व जेठाणी सर्व (रा. म्हसवे ता. पारोळा) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोना बागले करीत आहेत.

Related Stories

No stories found.