गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त

धुळे तहसीलदारासह पथकाची धडक कारवाई
गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त

धुळे । Dhule । प्रतिनिधी

तालुक्यात गौण खनिजाची (secondary minerals) अवैधरित्या चोरी (illegally stolen) करून वाहतूक करणार्‍यांवर (transporters) आज धुळे ग्रामीणच्या (Dhule Rural) तहसिलदार गायत्री सैंदाणे (Tehsildar Gayatri Saidane) यांच्या पथकाने (squad) धडक कारवाई (action) केली. या कारवाईत नऊ वाहने जप्त केल्याची माहिती आहे.

गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त
माजी आ. गुरुमुख जगवानींसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

धुळे तालुक्यात अनेक गावांमध्ये गौण खनिज माफियांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नसल्याच्या तक्रारी तहसिलदार सैंदाणे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सहा. जिल्हाधिकारी तथा प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार सैंदाणे यांनी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांना सोबत घेत आज दुपारी धुळे तालुक्यातील न्याहळोद, दह्याणे, ब्रेंद्रेपाडा या गाव शिवारात जावून कारवाई केली.

गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त
दुचाकीत ड्रेसची ओढणी गेल्याने महिला ब्रेनडेड

यावेळी अवैधरित्या गौणखनिजाची वाहतुक करणारी नऊ वाहने ताब्यात घेतल्याचे वृत्त असून त्यात 5 ट्रॅक्टर, 3 डंपर आणि 1 पोकलॅण्डचा समावेश आहे. दरम्यान दह्याणे-बह्याणे शिवारात माफियांनी मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे गौण खणिज उत्खनन केले आहे. त्याचे मोजमाप करुन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश सहा. जिल्हाधिकारी श्रीमती धोंडमिसे यांनी तहसिलदार, मंडळ अधिकारी,तलाठी यांना दिले आहे. याबाबत उशिरापर्यंत कारवाईची प्रक्रिया सुरु होती.

गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त
आमळी येथे कन्हैयालाल महाराज यात्रोत्सवास प्रारंभ

ही कारवाई सहा जिल्हाधिकारी प्रांताधिकारी श्रीमती तृप्ती धोंडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसिलदार गायत्री सैंदाणे,मंडळ अधिकारी सी. यू पाटील , किरण कांबळे, दिलीप चौधरी, विजू पाटील, श्री.बांगर व सागर नेमाने, समाधान शिंदे, तलाठी महेंद्र पाटील, भूषण चौधरी, अतुल तारले, संदीप गवळी, गजानन सोनवणे यांच्या पथकाने केली.

गौणखनिजाची अवैध वाहतूक, 9 वाहने जप्त
बांबरूड येथे उभ्या ट्रकच्या चाकांची केली चोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com