वनजमिनीवर हॉटेलच्या माध्यमातून अवैध व्यवसाय

वनजमिनीवर हॉटेलच्या माध्यमातून अवैध व्यवसाय

धुळे Dhule । प्रतिनिधी

मौजे अंबापुर (Mauje Ambapur) (ता. साक्री) येथे राष्ट्रीय महामार्गालगत वन जमिनीवर (forest land) अतिक्रमण (Encroachment) करुन अवैधरित्या (Illegal business) हॉटेल (hotels) टाकुन अवैद्य धंदे सुरू आहेत. तरी त्याचा कायदेशीर बंदोबस्त करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र ठेलारी महासंघातर्फे (Maharashtra Thelari Mahasangh) निदर्शन करण्यात आली. तसे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले.

यावेळी शिवदास वाघमोडे, सोनु टिळे, मोहन धिवरकर, अनिल भोईकर आदी उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, मौजे अंबापुर येथील गट नं. 28/1 व 28/2 हा नॅशनल हायवे लगत गट असुन, सदर जमीन ही वनजमीन आहे. या जमीनीवर अनेक वर्षापासून काही इसमांनी अवैध कब्जा केला आहे.

तसेच जमिनीवर बेकादेशीररित्या हॉटेल व्यवसाय करीत आहेत. दारु तसेच इतर अवैध व्यवसाय सर्रासपणे चालु आहे. इसम हे अतिशय आडदांड व गुंड प्रवृत्तीचे असुन त्यांच्याबाबत गावातील कोणीही व्यक्ती समोर येवून बोलण्यास देखील तयार नाही. एवढी दहशत त्या लोकांची आहे. असे असतांना वनविभाग व महसुल अधिकारी मात्र कुठलीही कारवाई करीत नाही. वन अधिकारी एकीकडे गरीब मेंढपाळांवर मेंढया चारण्यावरुन खोटे गुन्हे दाखल करीत असतात दुसरीकडे मात्र असे गुंड प्रवृत्तीचे लोक वनजमिनवर सर्रासपणे अतिक्रमण करुन अवैद्य धंदे करीत असतात.

त्याबाबत कुठलीही कारवाई करीत नाही. वास्तविक केंद्र व राज्य सरकारचे शासन निर्णय तसेच सर्वाच्च न्यायालयाचे अतिक्रमणाबाबत दिलेले निर्देशांची पायमल्ली होत असतांना देखील प्रशासन मात्र अशा अतिक्रमण धारकांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्याचा आरोपही महासंघाने केला आहे.

तरी संबंधीतांचा शोध घेवून वन जमिनीवरील अतिक्रमण काढून संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com