धुळ्यात घराला आग : वृध्देचा होरपळून मृत्यू

धुळ्यात घराला आग : वृध्देचा होरपळून मृत्यू

धुळे dhule । प्रतिनिधी

शहरातील वरखेडी रस्त्यावरील राम प्लॉट परिसरात एका घराला (House fire) काल रात्री दोन वाजेच्या सुमारास आग लागली. या आगीत 85 वर्षीय वृध्देचा (old woman) होरपळून मृत्यू (Death) झाला. मंजुळा काळू शिंपी असे मयत महिलेचे नाव आहे.

या आगीत घरातील वस्तू व संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. यात दीड ते दोन लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.

मयत महिला एकटीच राहत होती. आग लागल्यानंतर अग्नीच्या ज्वाला व धूराचा लोळ दिसल्यानंतर नागरिक मदतीसाठी आले. परंतु तोपर्यत वृध्देचा होरपळून मृत्यू झाला. कचरा वेचून सदर वृध्दा आपला उदरनिर्वाह करत होती. घटनेची नोंद पोलिसांत करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com