
बोराडी । Boradi । वार्ताहर
सातपुड्याच्या पायथ्याशी (foot of Satpuda) असलेल्या डोंगराळ भागासह (mountainous terrain) बोराडी परिसरात मुसळधार पाऊस (Heavy rains) झाल्याने नदी-नाल्यांना (rivers and streams) मोठ्या प्रमाणावर पूर (floods) आला आहे. पहिल्याच पावसात बोराडी परिसरातील सर्व बंधारे भरून वाहत आहेत. तर काळ्यापाण्याचे धरण (Blackwater Dam) देखील अर्धे भरले आहे.
यामुळे बोराडी गावातील पाण्याचा प्रश्न देखील सुटला आहे. तसेच शेतातून परत येत असतांना अचानक नाल्याला पाणी आल्याने शेतकर्याची दुचाकी मोटरसायकल पाण्यात वाहून गेली आहे. यात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.
आज दुपारच्या वेळी पावसाने (Heavy rains) जोरदार हजेरी लावली.सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या डोंगराळ भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने नदी - नाले भरून वाहत आहेत बोराडी येथील लेडर्यानाला, सती मायेचानाला, नदीनाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काळापाण्याचे धरण, तेलीचे धरण व परिसरातील इतर धरणात चांगलेच पाणी आले आहे.
समाधानकारक पाऊस (Satisfactory rainfall) झाल्याने शेतकर्यांनी आनंद व्यक्त केलेला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाची दमदार हजेरी लागल्यामुळे शेती कामांना वेग आला आहे. बाजारात शेतकरी बियाणे खरेदीसाठी बाहेर पडले आहेत.