धुळे शहरासह परिसरात मुसळधार पाऊस

शाळेच्या मैदानात पाणी साचल्याने आयुक्तांच्या दालना बाहेर विद्यार्थ्यांची भरली शाळा
धुळे शहरासह परिसरात मुसळधार पाऊस

धुळे । प्रतिनिधी dhule

शहरासह परिसरात काल रात्री जोरदार पाऊस (Heavy rain) झाला. रात्री दहा वाजता सुरू झालेला पाऊस तब्बल अडीच तास धो धो कोसळत होता. अधून मधून वेग वाढवत तर कमी कमी होत रात्रभर पाऊस सुरूच होता.

यामुळे शहरातील भंगार बाजार परिसरात (Municipal Corporation) महानगर पालिकेच्या उर्दू 20 नंबर शाळेच्या मैदानात गुडघाभर पाणी साचले. आवारात अक्षरशः तलाव झाल्याने आता शाळेत जायचे कसे, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला. ही समस्या प्रत्येक वर्षी पावसाळ्यात भेडसावते.

आजही पालिका अधिकाऱ्यांना याबाबत सांगण्यात आले पण काहीही उपयोग झाला नाही. अखेर विद्यार्थ्यांनी महापालिकेत येऊन आयुक्तांच्या दालनबाहेरच शाळा भरविली.

शाळेच्या मैदानात भर करावी, अशी मागणी जुनीच आहे. याबाबत अनेकदा तक्रार करण्यात आली होती. पण एकदा केलेल्या पाहणी नंतर काहीचं हालचाल झाली नाही. आधीचं यावर कारवाई झाली असती तर विद्यार्थ्यांना असे शाळेबाहेर असे ताटकळत उभे राहावे लागले नसते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com