पिंपळनेर, धुळे, सोनगीर परिसरात जोरदार पाऊस

पिंपळनेर, धुळे, सोनगीर परिसरात जोरदार पाऊस

धुळे/पिंपळनेर/सोनगीर । Dhule । वार्ताहर

साक्री तालुक्यातील पिंपळनेर परिसरात (Pimpalner area) तर धुळे तालुक्यातील लामकानी, सोनगीर (Lamkani, Songir) पट्ट्यात पावसाने जोरदार हजेरी (Heavy rain showers) लावली. मान्सुनची एन्ट्री दमदार झाली असली तरी केवळ काही भागात पाऊस झाल्याने शेतकर्‍यांना पावसाची मोठी प्रतीक्षा आहे.

पिंपळनेर शहरासह नवडणे, धाडणे, शेणपूर, सामोडे, चिकसे, देगाव, शिरवाडे, बल्हाणे व परीसरात आज जोरदार पाऊस (Heavy rain showers) झाला. वेळेवर आलेल्या पावसाने शेतकरी (Farmers) सुखावला असून खरीपाच्या तयारीला वेग (Accelerate kharif preparations) आला आहे

पिंपळनेरसह परीसरात आज मृगनक्षत्राच्या (Mriganakshatra) पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर उकाडा जाणवत होता. तर दुपारी चार वाजेनंतर वादळी वारा, ढगांचा गडगडाट (With a thunderclap) तर विजांच्या कडकडटासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले. कांदा विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची एकच धावपळ उडाली. तर व्यापार्‍यांनी खरेदी केलेला कांदा शेडमध्ये उघड्यावर असल्याने तो ओला झाला.

दुपारनंतर वातावरणात बदल होवून ढग भरुन आले. यामुळे बळीराजा आनंदला. मशागत करुन आणि पेरणी करुन सज्ज असलेल्या शेतकर्‍याला पावसाची प्रतीक्षा आहे. आता मान्सुन खर्‍या अर्थाने दाखल होण्याची आवश्यकता असून धुळे तालुक्यातील लामकानी, चिंचवार, बोरीस, सोनगीर या पट्ट्यात पावसाने हजेरी लावली.

धुळे शहर परिसरातही पावसाचे वातावरण निर्माण होवून वादळ सुरु झाल्याने सायंकाळी वीजुपरवठा खंडीत (Power outage) झाला. सायंकाळी 5 वाजेनंतर खंडीत झालेला पुरवठा रात्री उशिरापर्यंत पुर्ववत झालेला नव्हता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com