
धुळे ।dhule। प्रतिनिधी
पीएम किसान योजनेच्या (PM Kisan Yojana) ऑनलाईन अर्जाची पडताळणी करण्यासाठी 300 रूपयांची लाच (bribe) घेणार्या धुळे तालुका कृषी कार्यालयातील (Dhule Taluka Agriculture Office) डेटा ऑपरेटरला (data operator) एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. आज दुपारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक येथे वास्तवास असलेले तकारदार यांची धुळे तालुक्यात मौजे पुरमेपाडा येथे वडीलोपार्जित शेत जमिन आहे. या शेत जमिनीमध्ये तकारदार यांची आईला पीएम किसान योजनेचा लाभ मिळत होता. पंरतू तक्रारदार यांची आई सन 2019 मध्ये मयत झाल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. त्यामुळे तकारदार यांनी सुमारे 2 वर्षापुर्वी शेत जमिनीवर पीएम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. ऑनलाइन अर्जाच्या पडताळणीचे काम तलाठी यांच्याकडुन कृषि खात्याकडे देण्यात आल्याने तक्रारदार यांना धुळे तालुका कृषि कार्यालय येथील डेटा ऑपरेटर सुनिल सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्या मोबाईलवर फोन करून त्यांनी भरलेल्या पीएम किसान योजनेच्या ऑनलाईन अर्जाचे पडताळणी करण्यासाठी कागदपत्र देण्यास सांगितले.
त्यावेळी तक्रारदार यांनी ते नाशिक येथे राहत असल्याचे नाशिक येथुन धुळे येथे येवु शकत नसल्यांचे सांगुन त्यांच्या सांगण्यावरून तक्रारदार यांनी त्यांना त्यांच्या व्हॉटसअॅप मोबाईल क्रमांकावर कागदपत्रांच्या फोटोकॉपी पाठविल्या. तेव्हा त्यांनी तक्रारदार यांना त्यांचे काम करून देण्यासाठी पैसे लागतील असे सांगुन तक्रारदार यांना आज दि.27 जानेवारी रोजी तालुका कृषि कार्यालय येथे बोलविले असल्याची माहिती तक्रारदार यांनी धुळे लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयांच्या अधिकार्यांकडे व्हॉटसअॅपद्वारे दिली होती.
त्यावरुन तक्रारदाराशी धुळे एसीबीच्या अधिकार्यांनी संपर्क साधुन त्यांची भेट घेऊन तक्रार नोंदवुन घेतली. तक्रारीची पडताळणी दरम्यान धुळे तालुका कृषि कार्यालयांचे डेटा ऑपरेटर सुनिल रामदास सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांचे पीएम किसान योजनेचा ऑनलाईन फॉर्म पडताळणी करून देण्यासाठी 300 रूपयांच्या लाचेची मागणी केली.तसेच लाचेची रक्कम धुळे तालुका कृषि कार्यालयात स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण तसेच राजन कदम, शरद काटके, भुषण शेटे, प्रशांत बागुल, गायत्री पाटील, संतोष पावरा, संदीप कदम रामदास बारेला, रोहीणी पवार, प्रविण पाटील, मकरंद पाटील सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली आहे.