पिस्टल खरेदी-विक्री करणार्‍या हरियाणाच्या तरूणाला अटक ; साथीदार फरार

चार पिस्टल, पाच जिवंत काडतूस जप्त, नरडाणा पोलिसांची कामगिरी
पिस्टल खरेदी-विक्री करणार्‍या हरियाणाच्या तरूणाला अटक ; साथीदार फरार

धुळे - प्रतिनिधी dhule

शिंदखेडा (Shindkheda) तालुक्यातील दभाषी येथे गावठी बनावटीचे पिस्टल (Pistol) खरेदी-विक्रीसाठी आलेल्या हरियाणाच्या (Haryana) तरूणाला नरडाणा पोलिसांनी (Nardana Police) सापळा रचत शिताफिने अटक केली. तर त्याचा साथीदार फरार झाला.

तरूणाकडून 4 पिस्टल व 5 जिवंत काडतूस असा दोन लाखांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. दभाषी गाव परिसरात दोन इसम पिस्टल खरेदी-विक्रीसाठी आले असल्याची गुप्त माहिती काल सायंकाळी नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाने साध्यावेशात ठिकठिकाणी सापळा रचला.

शोध सुरू असतांना दभाषी बसस्थानकासमोर दोन जण संशीयतरित्या थांबलेल दिसले. त्यातील एक जण पायी रस्ता ओलांडून बस स्थानकाजवळ येवून थांबला. त्यांच्याजवळ एक बॅगही दिसून आली. संशय बळावल्याने पथकाने त्याला घेराव घालून पकडले. तर समोर थांबलेला त्याचा साथीदार पोलिसांना पाहुन शेतात पसार झाला. शक्तीसिंग सुरेश कुमार (वय 31 रा. गंगाटन पोस्ट डिंगल ता.बेरी जि. झंज्जर, हरियाणा) असे पकडलेल्या तरूणाने त्याचे नाव सांगितले. त्याच्या बॅगेची झडती घेतली असता चार पिस्तूल मिळून आले.

प्रत्येकी 40 हजार रूपये किंमतीच्या तीन व 60 हजारांची एक गावठी पिस्टल तसेच प्रत्येकी दोन हजार रूपये किंमतीच्या चार मॅक्झीन व 5 हजार रूपये किंमतीच्या पाच जिवंत काडतूस असा एकुण 1 लाख 95 हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. त्याला अटक केली असून त्याने चौकशीत त्याने साथीदाराच नाव कपील जाट असे सांगितले.

याप्रकरणी पोकाँ गजेंद्र पावरा यांच्या फिर्यादीवरून दोघांवर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोहेकाँ धनगर करीत आहेत. पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मनोज ठाकरे, पोहेकाँ प्रकाश माळी, सचिन सोनवणे, पोना बापू बागले, सचिन माळी, विजय पाटील, पोकाँ ग्यानसिंग पावरा, सुरेंद्र खांडेकर, गजेंद्र पावरा, अर्पण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com