
सोनगीर - वार्ताहर Songir
दोंडाईचाकडून (Dondaicha) येणाऱ्या (Scorpio) स्कार्पिओमधून येथील (police) पोलिसांनी शुक्रवारी दि.29 रोजी दोन लाखाचा प्रतिबंधित विमल गुटखा पकडला. पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांच्या गस्ती पथकाने ही कारवाई केली.
दोंडाईचाकडून सोनगीरकडे येणाऱ्या स्कार्पिओमधून प्रतिबंधीत विमल पानमसाला धुळ्याला नेला जाणार असल्याची माहिती येथील (api Chandrakant Patil) सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी सोनगीर फाट्यावर सापळा रचला. पहाटे सोनगीर खेतिया राज्यमार्गावर दोंडाईच्याकडून एक स्कार्पिओ (एमएच 18 ए 6665) येताना दिसल्याने पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र चालकाने वेग वाढवत वाहन भरधाव वेगाने धुळ्याकडे नेले.
पोलिसांनी शासकीय वाहनाने स्कार्पिओचा पाठलाग करून सोनगीर टोल नाक्यापुढील सरवड फाट्याजवळ गतीरोधकावर थांबविले. चालक अन्सारी अजीम अहमद मोहम्म्द शमीम (वय-27 रा. जनता सोसायटी, हजरत अली
मशिद, धुळे) यास ताब्यात घेतले. मात्र अंधाराचा फायदा घेऊन एक संशयित पसार झाला. वाहनाची तपासणी केली असता त्यात विमल पानमसाला भरलेल्या गोण्या दिसून आल्या. दोन लाख 20 हजाराचा गुटखा व सहा लाखाचे वाहन असे आठ लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रविंद्र महाले तपास करीत आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक
चंद्रकांत पाटील, उपनिरिक्षक रवींद्र महाले, हवालदार अशोक पवार, पोलीस सुरज सावळे, विजय पाटील यांनी कारवाईत भाग घेतला.