धुळ्यात दीड लाखांचा गुटखा जप्त, दोन जण ताब्यात
धुळे । dhule। प्रतिनिधी
शहरातील मच्छीबाजार परिसरातील नंदी रोडवरील दुकानात (shop) छापा (raid) टाकत पोलिसांनी (police) 1 लाख 60 हजारांचा विमल गुटखा (Vimal Gutkha) ए-1 तंबाखू व पान मसाल्याचा साठा (Stock) जप्त (seized) केला. तसेच दोन जणांना ताब्यात (two arrested) घेतले. याप्रकरणी आझादनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आझादनगर पोलिस ठाणे हद्दीत मच्छिबाजार परिसरात नंदी रोडवर एक जण त्यांच्या दुकानात राज्यात प्रतिबंधीत गुटखा बाळगून असल्याची गुप्त माहिती सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी एस ऋषीकेश रेड्डी यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्यासह पथकाने काल सायंकाळी छापा कारवाई केली.
दोन जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 1 लाख 60 हजारांचा गुटख्याचा साठा जप्त केला.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधिक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलिस अधिक्षक रेड्डी, पोसई दत्तात्रेय उजे, हेकाँ कबीर शेख, रमेश उघडे, पोना कर्नल चौरे, पोकाँ अकिला शेख, सोनाली बोरसे, देवेंद्र काकडे, अतूल पवार यांच्या पथकाने केली.