अपघातग्रस्त वाहनातून नऊ लाखांचा गुटखा जप्त

एक जण ताब्यात, नरडाणा पोलिसांची कामगिरी, सव्वाबारा लाखांचा मुद्देमाल हस्तगत
गुटखा
गुटखा

धुळे Dhule। प्रतिनिधी

मुंबई - आग्रा महामार्गावरील गोराणे फाट्याजवळ अपघातग्रस्त (accident vehicle) बोलेरो वाहनातून 9 लाखांचा गुटखा (Gutkha) नरडाणा पोलिसांनी जप्त केला. तसेच एकाला ताब्यात घेण्यात आले.

प्रतिबंधित गुटखा, तंबाखूची बेकायदेशिररित्या वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. मात्र गोराणे फाट्याच्या अलीकडेच या वाहनाला अपघात झाल्याने ते रस्त्याच्या कडेला पडलेले होते.

धुळ्याकडून शिरपूरकडे एका बोलेरो वाहनातून प्रतिबंधीत गुटख्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती नरडाणा पोलीस ठाण्याचे सपोनि चंद्रकांत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी पथकास कारवाईच्या सुचना केल्या. दि.30 डिसेंबर रोजी रात्री 2.25 वाजता पथकाने गोराणे फाट्यावर पाळत ठेवली. मात्र या वाहनाचा गोराणे फाट्याच्या अलीकडेच अपघात झाला. यात वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. या ठिकाणी पथकाने जावून बघितले असता संशयित बोलेरो वाहन क्र.एम.एच.48/ए. जी.0315 रस्त्याच्या कडेला उलटलेले दिसले. चालकाकडे वाहनात काय आहे, याबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परिणामी, पथकाने या बोलेरो वाहनाची तपासणी केली. या तपासणीत प्रतिबंधीत गुटखा व तंबाखुचा साठा पथकाला आढळून आला. यात 7 लाख 77 हजार 920 रूपये किंमतीचे विमल पानमसाल्याचे 4 हजार 160 पॅकेटस, 1 लाख 37 हजार 280 रूपये किंमतीचे प्रतिबंधीत तंबाखूचे 4 हजार 160 पाकिटे असा एकूण 9 लाख 15 हजार 200 रूपयांच्या मुद्देमालाचा समावेश होता.

या कारवाईत विकास गुलाब कनोजे रा. आंबा, ता.शिरपूर, याला ताब्यात घेण्यात आले असून तीन लाखाच्या बोलेरो वाहनासह एकूण 12 लाख 15 हजार 200 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर नरडाणा पोलीस ठाण्यात अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन, कलम 59 (ळ) अन्वये तसेच भादंवि कलम 279, 188, 272, 273, 328 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. चंद्रकांत पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com