ट्रॅव्हल्ससह 25 लाखांचा गुटखा जप्त , तिघांवर गुन्हा

ट्रॅव्हल्ससह 25 लाखांचा गुटखा जप्त , तिघांवर गुन्हा

धुळे । Dhule। प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील लळींग टोल नाका (Laling Toll Gate) येथे नाकाबंदी करत मोहाडी पोलिसांनी ट्रॅव्हलमधून (travels) सव्वा पाच लाखांचा गुटखा (Gutkha) पकडला. 20 लाखांची ट्रॅव्हल्स आणि गुटखा असा एकुण 25 लाखांचा मुद्येमाल जप्त (Seizure of valuables) करण्यात आला. काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

याबाबत अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी मोहाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लळींग टोल नाक्यावर एमपी 07 पी 5090 क्रमांकाच्या अशोक ट्रॅव्हल्सची तपासणी करण्यात आली. त्यात पानमसाला आणि सुगंधीत तंबाखूचा साठा मिळून आला. त्यांची किंमत 5 लाख 29 हजार 680 रूपये इतकी आहे.

या गुटख्यासह 20 लाखांची ट्रॅव्हल्स असा 25 लाख 29 हजार 680 रूपयांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच चालकासह तिघांना ताब्यात घेण्यात आले. अवैधरित्या राज्यात प्रतिबंधीत असलेल्या गुटख्याची वाहतूक केल्याप्रकरणी चालक जयप्रकाश रमेश पाटीदार (वय 34 रा. आदर्श नगर, इंदूर), सहचालक अरूण शिवनाथ यादव (वय 46 रा. किरोद करताल पुराण बस्ती, तेजाजी नगर, इंदूर) व हकीम खान नबीनुर खान (वय 29 रा. ग्राम बाबंदा ता. कचराव जि. खरगोन) या तिघांविरोधात गुन्हा दाखल झालाआहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राऊत करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com