राजमाता अहिल्यादेवी, संत झुलेलाल स्मारकास हिरवा कंदील

माजी मंत्री आ.जयकुमार रावल : दोंडाईचात उभारणार स्मारक
जयकुमार रावल
जयकुमार रावल

दोंडाईचा । Dondaicha। प्रतिनिधी

येथे माजी मंत्री आ.जयकुमार रावल (Former Minister Jayakumar Rawal) यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवराय, महाराणा प्रतापसिंह, शहिद अब्दुल हमीद यांच्या स्मारकांप्रमाणेच (monuments) राजमाता अहिल्यादेवी होळकर (Rajmata Ahilya Devi Holkar) आणि संत झुलेलाल (Saint Jhulelal) यांच्या स्मारकाला देखील परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी MdemandI केली होती. या मागणीला अखेर यश मिळाले असून दोन्ही स्मारकांसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा (Collector Jalaj Sharma) यांनी परवानगी (allowed) दिली आहे.

त्यामुळे राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि संत झुलेलाल यांचे स्मारक होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

आ. रावल यांनी दोंडाईचा शहरात सर्वच महान विभुतींचे स्मारक व्हावे अशी संकल्पना मांडली असून पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे अश्वारूढ स्मारक नंदूरबार चौफुलीवर, महाराणा प्रतापसिंह यांचे स्मारक अमरावती नदीच्या किनारी तर शहीद अब्दुल हमीद यांचे स्मारक राजपथावर उभारण्यात आले होते, दुसर्‍या टप्प्यात राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि संत झुलेलाल यांचे स्मारक होण्यासाठी गेल्या दिड वर्षापासुन पाठपुरावा सुरू होता. यासाठी आ.जयकुमार रावल यांनी निधी देखील मंजूर केला होता. पंरतू परवानगी अभावी हे काम रखडले होते. मागील काळात परवानगी न दिल्यास आंदोलन देखील करण्याचा इशारा आ. रावल यांनी दिला होता. अखेर जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी या दोन्ही महापुरूषांच्या स्मारकांसाठी परवानगी दिली.

दिलेला शब्द पूर्ण केला

दोंडाईचा शहरात रस्ते, पाणी, विविध चौकांचे सुशोभिकरण, विविध कॉलन्यामध्ये खुल्या जागांवर जॉगिग ट्रॅक, हे बनत असतांना महापुरूषांची प्रेरणा मिळावी त्यांचे सदैव पुढील पिढीस आदर्श असावा या उददेशाने स्मारके तयार करण्याचा संकल्प केला होता. शहरातील जनतेला तसा शब्द देखील दिला होता, तो शब्द पूर्ण केल्याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री आ. रावल यांनी दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com