जीपीएस टोल लवकरच सुरु!

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची धुळ्यात घोषणा
जीपीएस टोल लवकरच सुरु!

धुळे । Dhule

महामार्गावर टोलऐवजी लवकरच जीपीएस टोल सिस्टिम सुरू केली जाणार आहे. त्यामुळे तुमची गाडी कोणी अडविणार नाही. वाहन जेवढे अंतर जाईल तेवढाच वाहन मालकांना टोल भरावा लागेल. तुमच्या जिल्ह्यात नवीन टोल होतील तेव्हा नक्कीच त्याचा विचार करू, असे आश्वासन केंद्रीय रस्ते, परिवहन व महामार्गमंत्री नितीन गडकरी (Union Minister for Roads, Transport and Highways Nitin Gadkari) यांनी धुळ्यात दिले.

शहरासह जिल्ह्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व लोकार्पणासाठी आज ना.गडकरी हे धुळे दौर्‍यावर आले होते. नागपूर येथून विशेष विमानाने येथील गोंदूर रोडवरील विमानतळावर त्यांचे सकाळी आगमन झाले. तेथून ना. गडकरी वाहनाने थेट देवपूरमधील श्री स्वामिनारायण मंदिरात पोहोचले. तेथे दर्शन घेतल्यानंतरच त्यांच्या धुळे शहरातील दौर्‍याला प्रारंभ झाला. त्यानंतर राजर्षी शाहु नाट्य मंदिरात (Rajarshi Shahu Natya Mandir) कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या धुळे, नंदुरबार जिल्ह्यांचा विकास झाला पाहिजे.

उद्योग-व्यवसाय वाढले पाहिजेत. औद्योगिक विकास झाला पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे, सिंचन वाढले पाहिजे, ही जी तुमच्या मनातील भावना आहे तीच आमच्या मनातीलही भावना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) स्वप्नातील भारत निर्माण करण्यासाठी आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करू या, असे आवाहनही ना.गडकरी यांनी यावेळी केले.

राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वरील ओट्रम घाटाचे चौपदरीकरणाचे काम करणे देखील अत्यंत महत्वाचे होते. जवळपास पंधरा किमी काम झाले असून आज त्याचे भुमिपुजनही ठेवले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कामांना दिली मंजुरी

राजर्षि शाहु नाट्यमंदिरात (Rajarshi Shahu Natya Mandir) झालेल्या कार्यक्रमात आमदार, खासदारांनी मागणी केलेल्या सर्वच रस्ते कामांना ना. गडकरी यांनी मंजुरी दिली. त्यात कुसुंबा, दोंडाईचा, दोेंडाईचा-शहादा रस्ता मंजुरीची घोषणा दिली. तसेच विसरवाडी-कळवा विस्तारीकरण, नंदुरबार व तळोदा शहराचे रिंगरोड, सटाणा, मालेगाव बायपास देखील करून देण्याची घोषणा केली. तर बडोदा ते राजपिपला महामार्ग थेट भुसावळपर्यंत जोडण्याबाबत अभ्यास करण्याच्या व प्रसंगी यासह अंकलेश्वर-बुर्‍हाणपुर महामार्गाचे काम करून देवू असेही सांगितले.

Related Stories

No stories found.