प्रवासी बनून गांजा नेणारे तिघे जेरबंद

56 हजारांचा माल जप्त, धुळे तालुका पोलिसांची कामगिरी
प्रवासी बनून गांजा नेणारे तिघे जेरबंद

धुळे - प्रतिनिधी dhule

बसमधून (bus) प्रवासी (passengers) बनुन गांजा नेणार्‍या तिघांना तालुका पोलिसांनी (police) मोठ्या शिताफिने जेरबंद केले. त्यांच्याकडून 56 हजारांचा ओला गांजा हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.

प्रवासी बनून गांजा नेणारे तिघे जेरबंद
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री
प्रवासी बनून गांजा नेणारे तिघे जेरबंद
धुळयात गुंगीकारक औषध साठ्यासह एकाला अटक

चोपडा (chopad) ते पुणे (pune) जाणाऱ्या एमएच 09 ईएम 3690 क्रमांकाच्या खाजगी ट्रॅव्हल्समधून (Travels) काही जण बेकायदेशीरपणे गांजा नेत असल्याची गोपनीय माहिती धुळे (dhule) तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाय दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने काल दि.10 रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास फागणे (ता.धुळे) शिवारात ट्रॅव्हल्सला थांबविले. तिघांना संशयीतांना ताब्यात घेतले. त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी सुरेश असरद छाजेड (वय 25 रा.बालमटाकळी ता. शेवगाव जि. सोलापूर), आनंद नागनाथ कापुरे (वय 19 रा. कोळेगाव ता. मोहोळ जि. सोलापूर) व सुनिल मद्रास पवार (वय 25 रा. महादेव दोंदवाड ता. शिरपूर) अशी नावे सांगितली.

प्रवासी बनून गांजा नेणारे तिघे जेरबंद
Video गिरीश भाऊंचे शब्द माझ्याकडे रेकॉर्ड आहेत-आ.एकनाथराव खडसे

त्यांच्याकडील बँगांची तपासणी केली असता एका विमल पानमसाला नावाच्या मोठ्या झोल्यामध्ये 11 किलो ओला गांजा मिळून आला. 56 हजार 990 रूपये किमतीचा हा गांजा जप्त करण्यात आला. तिघांवर एनडीपीएस कायद्याप्रमाणे धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.

प्रवासी बनून गांजा नेणारे तिघे जेरबंद
Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com