Good News : धुळ्यात घरोघरी मिळणार सीएनजी गॅस

खा.डॉ.सुभाष भामरे, गॅस पुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन, रिक्षाही सीएनजी गॅसवर धावणार
Good News : धुळ्यात घरोघरी मिळणार सीएनजी गॅस

धुळे । Dhule प्रतिनिधी

शहरात पाईपलाईनद्वारे (pipeline) सीएनजी गॅस (CNG gas) पुरविला जाणार आहे. ही योजना नागरिकांना समर्पीत करण्यात आली आहे. केवळ घरापुरता सीएनजी गॅस मर्यादीत राहणार नाही, तर दहा हजार पेक्षा जास्त रिक्षा सीएनजी गॅसवर धावतील, अशी माहिती खा.डॉ.सुभाष भामरे (Dr. Subhash Bhamre) यांनी दिली.

महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडतर्फे (Maharashtra Natural Gas Limited) शहरांमध्ये गॅसपाईप लाईनद्वारे वितरण प्रकल्पाचा (project) शुभारंभ आज अग्रसेन चौकात खा.डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलतांना खा.भामरे म्हणाले की, या प्रकल्पाचे उद्घाटन करतांना आनंद होत आहे. हा प्रकल्प आणेल असा शब्द दिला होता तो खरा केला आहे. पंतप्रधान (Prime Minister) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी जनतेला स्वस्त दरात पर्यावरण पुरक आणि सुरक्षित असा घरोघरी गॅस पुरवठा (Gas supply) करण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान व हरदीपसिंग यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याचे फलित शहरवासीयांना पाईपद्वारे गॅस पुरवठा होवू शकेल. हा प्रकल्प सहा महिने ते वर्षभरात पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. या प्रकल्पामुळे घरगुती ग्राहकांना पाईपद्वारे (pipeline) गॅस पुरवठा होणार आहे असे त्यांनी सांगितले.

पुढे बोलतांना खा.भामरे म्हणाले की, प्रत्येक स्त्रीला गॅस सिलिंडर संपल्यावर डोकेदुखी होते. परंतु आता घरापर्यंत गॅसची (CNG gas) पाईपलाईन (pipeline) येणार आहे. सीएनजी गॅस पासून कुठलाही धोका नाही. या गॅसचे अनेक फायदे आहेत. यापुर्वी तरी गॅस सिलिंडरचा स्फोट (gas cylinder) झाल्याने वित्त व प्राणहानी झाली आहे. त्यामुळे हा गॅस सुरक्षित असून त्यापासून धोका नाही, असेही त्यांनी सांगितले.

स्वयंपाक घरापर्यंत सीएनजी गॅस मर्यादीत राहणार नाही, तर दहा हजारापेक्षा जास्त रिक्षा या गॅसवर धावतील. रिक्षाधारकांना गॅससाठी किट बँकेकडून (bank) कर्जाद्वारे (loan f) मिळू शकते. सध्या रिक्षा या पेट्रोलवर धावत असल्याने त्यामुळे प्रदुषण (Pollution) होते. परंतु सीएनजी गॅसवर रिक्षा धावल्यास हा धोकाही टळू शकतो, असेही श्री.भामरे यांनी सांगितले.

सीएनजी शिवाय पर्याय नाही

सामान्य रिक्षाचालक रिक्षामध्ये पेट्रोल भरत होता. त्यावेळचा खर्च आणि आता सीएनजी गॅस (CNG gas) रिक्षात भरल्यानंतर काय फायदा होतो हे लक्षात येते. आयुष्य सुकर करण्यासाठी सीएनजी गॅसशिवाय पर्याय नाही. या योजनेच्या महिला गट याच खर्‍या लाभार्थी ठरणार आहेत. या गॅसपासून धोका नाही. पाईपलाईन लिकेज झाली तरी हा गॅस वातावरणात (atmosphere) लवकर मिसळतो.

यावेळी माजी आ.राजवर्धन कदमबांडे, राजेश पांडे, उद्योजक विनोद मित्तल, महापौर प्रदीप कर्पे, माजी महापौर चंद्रकांत सोनार, जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती शितल नवले, महिला बालकल्याण सभापती योगिता बागूल, उपसभापती आरती पवार, नगरसेवक हिरामण गवळी, माजी उपमहापौर कल्याणी अंपळकर, ओमप्रकाश अग्रवाल, भाजपच्या महिला अध्यक्ष माया परदेशी, अल्फा अग्रवाल, भाग्यश्री मंठाळकर, युवराज पाटील, सभागृहनेते राजेश पवार, गजेंद्र अंपळकर आदी उपस्थित होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com