शेळ्या-मेंढ्यांच्या औषधांचा निधी होतोय हडप

महाराष्ट्र ठेलारी महासंघाचा गंभीर आरोप, कॅबिनमध्ये बसून होते पशु गणना, अधिकार्‍यांची मुजोरी
शेळ्या-मेंढ्यांच्या औषधांचा निधी होतोय हडप

धुळे Dhule । प्रतिनिधी

धुळे जिल्ह्यात किती शेळ्या-मेंढ्या (Goat-sheep) आहेत. याची गणना (Calculation) कॅबिनमध्ये बसून केली जाते. कागदावर दिसणार्‍या शेळ्या-मेंढ्यांपेक्षा प्रत्यक्षात त्यांची संख्या कितीतरी पट जास्त आहे. असे असतांना संख्येच्या तुलनेत औषधी (medicine) उपलब्ध (Available) होत नाहीत. अधिकार्‍यांकडे मागणी केली असता औषधांचे वाटप करुन झाले, अशी उत्तरे मिळतात. मग आम्हाला औषधे मिळाली नाहीतर गेली कुठे? याचा अर्थ जनावरांच्या (animals) औषधांचा (medicine) निधी (Funding) परस्पर हडप (Hadap) होत असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र ठेलारी महासंघाने (Maharashtra Thelari Federation) केला आहे. या आशयाचे निवेदन त्यांनी जिल्हा परिषदेचे (Zilla Parishad) कृषी व पशुसवंधन सभापती (Chairman of Agriculture and Animal Husbandry) संग्राम पाटील यांना दिले.

महासंघाचे शिवदास वाघमोडे, अण्णासाहेब सुर्यवंशी, राजू मारनर, ज्ञानेश्वर सुळे यांच्यासह पदाधिकार्‍यांनी स्वाक्षरीनिशी दिलेल्या निवेदनात काही गंभीर आरोपी केले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, धुळे जिल्ह्यात शेळ्या-मेंढ्यांची संख्या सुमारे 52 लाख इतकी असल्याचा आमचा अनुमान आहे. परंतु संबंधित यंत्रणेने कॅबिनमध्ये बसून पशु गणना केली. 2019 च्या गणनेनुसार धुळे जिल्ह्यात पाच लाख मेंढ्या व साडे तीन लाख शेळ्या अशी आडेआठ ते नऊ लाख पशु गणना दिसून येते.

या तुलनेत एप्रिल महिन्यात केवळ 15 हजार एफएमडी लसीचे डोसेस उपलब्ध करुन देण्यात आले. पशु गणनेच्या आकड्यानुसार केवळ दीड टक्के डोस उपलब्ध झालेत. त्याच प्रमाणे जुन महिन्यात इटीवी लसीचे 96 हजार डोस उपलब्ध झाले असून ही संख्या पशु गणनेच्या अवघ्या 12 टक्के इतकी आहे.

वास्तविक दरवर्षी वेगवेगळ्या रोगराईमुळे लाखो शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू होतो. वेगवेगळ्या साथीच्या आजारात मोठ्या प्रमाणात मृत्यू झाल्याने पशुपालकांचे अत्यंत मोठे नुकसान होते. असे असतांना वारंवार मागणी करुनही औषधसाठा उपलब्ध होत नाही. अशीही त्यांची तक्रार आहे.

आजार पावसाळ्यात मात्र औैषधी वाटलीत उन्हाळ्यात

दरवर्षी पावसाळ्यात चिखलात उभ्या राहून मेंढ्यांची खुरे सडतात. यासाठी आयोडीन किंवा अ‍ॅन्टीसेप्टीक मलम अथवा कोरडी पावडर आवश्यक असते. या संदर्भात आपण जि.प. पशुसंवर्धन उपायुक्त लहंगे यांच्याकडे मागणी केली असता, आपल्याकडे उपलब्ध नाहीत. मागील मार्च महिन्यातच अ‍ॅन्टीसेप्टीक स्प्रे चे वाटप झाल्याचे त्यांनी सांगितले. पण आजार पावसाळ्यात होतात मग औषधी उन्हाळ्यात दिली कोणाला? असा सवाल ठेलारी महासंघाने उपस्थित केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com