मराठा सेवा संघातर्फे बळीराजाचा गौरव

कापडणे, बोरकुंडसह धनुरला प्रतिमा पूजन, विविध मान्यवरांची उपस्थिती
मराठा सेवा संघातर्फे बळीराजाचा गौरव

कापडणे Kapadane । प्रतिनिधी

सम्राट बळीराजा गौरव दिनानिमित्त (Emperor Baliraja Gaurav Dina) मराठा सेवा संघातर्फे (Maratha Seva Sangha) सम्राट बळीराजांची प्रतिमा पूजन (Idolatry) करण्यात आले. मराठा सेवा संघाच्या मालोजीराव भोसले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध मान्यवर उपस्थित होते. तसेच कापडणे, धनुर, बोरकुंड आदी ठिकाणी प्रतिमापूजन करण्यात आले.

मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, सचिव एस.एम.पाटील, प्रकाश पाटील, राजस्थान प्रभारी अनंत पाटील, पी.एन.पाटील, शिवव्याख्याते प्रेमचंद अहिरराव, प्रा.सदाशिव सुर्यवंशी, मिलन पाटील, शाम निरगुडे, प्रविण पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सुलभाताई कुंवर, जिल्हाध्यक्ष नुतनताई पाटील, छाजेंद्र सोनवणे, भुषण पाटील, रामकृष्ण पाटील, प्रा.प्रशांत भदाणे, नितिन पाटील, शाम भदाणे, संदीप भदाणे, आदी मान्यवर उपस्थित होते.

कापडणे व धनुरला प्रतिमापूजन- कापडणे येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाजवळ, धुळे तालुका सावता परिषदेच्या वतीने सम्राट बळीराजा प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष नवल पाटील, उपसरपंच प्रतिनिधी अंजन पाटील, माजी सरपंच जीवन माळी, माजी उपसरपंच राजा पाटील, उज्वल बोरसे, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष रामकृष्ण पाटील, संघाच्या कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, हिम्मत बोरसे, मनोहर बन्सीलाल पाटील, गुलजार माळी, विशाल शिंदे, मनोज पाटील, ग्रा.पं. सदस्य हिम्मत चौधरी, निलेश जैन, प्रवीण बन्सीलाल पाटील, अमोल बोरसे, कैलास माळी, दिनकर माळी, अशोक पाटील, मनोज माळी, नितीन माळी, भटू माळी, ललित पाटील, योगेश पाटील, रवींद्र पाटील, राजेंद्र माळी, शांताराम माळी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष उमाकांत खलाणे प्रयत्नशिल होते. यावेळी मराठा सेवा संघाचे कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, उमाकांत खलाणे यांनी मनोगत व्यक्त केले. धनुर येथेही सम्राट बळीराजांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी धनुर सरपंच सत्यभामाताई शिंदे, मराठा सेवा संघ प्रणित कृषी आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, उपसरपंच कमलबाई पटेल, धनुर पोलीस पाटील संदेश पाटील, लोणकुटे पोलीस पाटील राहुल शिरसाठ, ज्येष्ठ कार्यकर्ते चिंधा सैंदाणे, आनंद शिंदे, किरण शिंदे, सुरेश शिंदे, श्री.वाघ, रावसाहेब कोळी आदी उपस्थित होते.

बोरकुंड येथे संभाजी ब्रिगेडतर्फे बळीपूजन- बलिप्रतिपदेला शेतकर्‍यांचा राजा, सम्राट बळीराजा यांच्या प्रतिमेचे बोरकुंड येथे संभाजी ब्रिगेडतर्फे पूजन करण्यात आले. यावेळी बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पंचायत समिती माजी सभापती प्रभाकर भदाणे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र माळी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर भदाणे, माजी जिल्हा परिषद सदस्य देविदास माळी, माजी सरपंच राजू मराठे आदींसह ग्रामपंचायत सदस्य गंगाधर वाघ, विनोद भदाणे, पंकज भदाणे, राजेश भदाणे, अनिल भदाणे, प्रवीण वाघ, गंगाधर वाघ, शैलेंद्र भदाणे, सुनील भदाणे, अरुण वाणी, कमलेश भदाणे, संदीप भदाणे, निलेश मिस्तरी, मनोज गढरी, मनोहर अहिरे, भटु अहिरे, दीपक माळी, मनोज आहिरे, निलेश भदाणे, संजय भदाणे, कृष्णा वाघ, रमाकांत मिस्तरी, नाना ठाकरे, भरत कुंभार, अनिल भदाणे, बंडू पवार, भटू हितेश पारीख, जितू जैन, भाऊसाहेब सैंदाणे, चेतन भदाणे, अरुण वाणी, योगेश भदाणे, तुषार भदाणे, मोहन शिंपी, राजेंद्र वाघ, रवींद्र भदाणे, उपेंद्र भदाणे, शुभम भदाणे, नीरज बागुल, शांताराम भदाणे, मोहन भदाणे, भैया माळी आदी उपस्थित होते. मराठा सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष दीपक भदाणे यांनी प्रास्तविक तर आभारप्रदर्शन प्रा.हंसराज भदाणे यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com