कोरा स्टॅम्प देताय.. जरा सावधान..

कोरा स्टॅम्प देताय.. जरा सावधान..

पिंपळनेर (Pimpalner) । वार्ताहर

पाच लाख रुपयांची आवश्यकता असल्याने सिक्युरिटी (Security)म्हणून एक कोरा चेक (A blank check) व कोरा स्टॅम्प (Blank stamp) दिला होता. परंतू चौघांनी त्याचा गैरवापर (misusage) करून घराचे (house) कुलूप तोडून (Breaking the lock) बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. तसेच मानसिक त्रास देऊन जीवे मारण्याची धमकी (Death threats) दिल्यावरून पिंपळनेर पोलिस ठाण्यात (Pimpalner Police Station) चौघांवर विरोधात गुन्हा (Crime) नोंद झाला आहे.

याबाबत डेअरी प्रोजेक्ट कन्सलटन्ट सुरेश शांताराम बागुल (वय 49 रा. सी-502, अल्बेरो सोसायटी, कोेंढवा बु. पुणे) यांनी पिंपळनेर पोलिसात फिर्याद दाखल दिली आहे. त्यानुसार त्यांना पैशांची आवश्यकता असल्याने त्यांनी चुलतभाऊ वाकी आश्रमशाळेतील माध्यमिक शिक्षक महेंद्र वसंत बागुल (रा. पिंपळनेर) यांच्याकडे 5 लाख रुपयांची मागणी केली होती. यावेळी बागुल यांना सिक्युरिटी म्हणून कोरा स्टॅम्प व कोरा चेक देऊन घराची सौदापावती करून लिहून दिली. बागुल यांनी फिर्यादीच्या खात्यावर 5 लाख रुपये ट्रान्सफर करून दिले. पण घर विक्रीचा कुठलाही व्यवहार झालेला नाही, असे म्हटले आहे. काही दिवसातच महेंद्र बागुल याने पैसे परत मागीतले.त्रासही देऊ लागला. पैसे दिले नाहीत तर जीवाचे बरेवाईट करून घेईल व तुला अडकून टाकेल, अशी धमकी दिली. त्या अनुषंगाने फिर्यादी याने आपले सरकार पोर्टलद्वारे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे अर्ज केला. त्याचा मनात राग ठेऊन महेंद्र बागुल याच्यासह हॉटेल व्यवसायीक हरिशचंद्र खंडु पाथरे उर्फ आबा पाथरे, राजेंद्र गुलाब वाघ व सुधाकर माधवराव जगताप (रा. घोड्यामाळ, इंदिरानगर, पिंपळनेर) यांनी संगनमताने कोरा स्टॅम्पचा गैरवापर करून स्टॅम्पवर कोणीतरी खोटामजकुर लिहून बनावट करून वापरून त्यांची फसवणूक केली. तसेच फिर्यादीची मिळकत बळकवण्याचे हेतूने कुलूप तोडून अनधिकृतरित्या घरात प्रवेश केला. तसेच बागुल यांना मानसिक त्रास देवून त्यांना वेळोवेळी जिवे मारण्याची धमकी दिली. 8 ऑक्टोबर 2018 ते 24 सप्टेंबर 2019 दरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी वरील चौघांवर भादंवी कलम 420, 406, 447, 448, 467, 468, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास पीएसआय पी.पी.सोनवणे हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com