अभ्यासासह खेळाला ही तेवढेच महत्त्व द्या!

राष्ट्रीय प्रशिक्षक व खेळाडूंचे आवाहन; मुकेश आर. पटेल सीबीएसई स्कूलच्या खेळाडूंचा गौरव
अभ्यासासह खेळाला ही तेवढेच महत्त्व द्या!

शिरपूर Shirpur। प्रतिनिधी

अभ्यासासह (study) खेळाला (sports) देखील तेवढेच महत्त्व (importance) द्या. शिस्त, फिजिकल फिटनेसकडे (Physical fitness) सर्वांनी लक्ष द्यावे. आपल्यात भरपूर क्षमता असून त्याचा पुरेपूर उपयोग करावा. यशस्वी खेळाडूंची प्रेरणा(Motivation) घेवून जीवनात यशस्वी व्हावे. आई-वडीलांच्या स्वप्नांना कधीही तडा जाऊ देऊ नका, असे आवाहन क्रिडा क्षेत्रातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व नामांकित खेळाडूंनी (nominated players) केले.

तालुक्यातील तांडे येथे श्री विलेपार्ले केळवणी मंडळ संचलित, मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलमध्ये (Mukesh R. Patel resident CBSE school) राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तसेच नामांकित खेळाडूंनी स्कूलमधील खेळाडूंना विशेष मार्गदर्शन करुन त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र, बक्षिसे देवून गौरविण्यात आले.

मुकेश आर. पटेल निवासी सीबीएसई स्कूलमध्ये दि. 8 ते 19 एप्रिल या कालावधीत एस.व्ही.के.एम. संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, संस्थेचे सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली समर कॅम्प (Summer Camp) उत्साहपूर्ण वातावरणात सुरु असून विद्यार्थी (Student) उत्साहात विविध खेळांचे प्रशिक्षण घेत आहेत. तसेच खेळण्याचा मनमुराद आनंद घेत आहेत.

खेळाडूंना समर कॅम्पमध्ये बॉक्सिंग, कुस्ती, घोडेस्वारी, क्रिकेट, फुटबॉल, बॅडमिंटन, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, कॅरम, बुद्धिबळ अशा विविध खेळांचे विशेष मार्गदर्शन करण्यात आले. बुधवारी सायंकाळी शिरपूर पीपल्स बँक चेअरमन योगेश भंडारी, विजय अग्रवाल, यशवंत बाविस्कर, एस.व्ही.के.एम. स्पोर्ट चेअरमन व बी.सी.सी.आय. माजी संचालक नवीन शेट्टी, इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव नामदेव शिरगांवकर, अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू व 1988 च्या सेऊल ऑलिम्पिक मधील ऑलिंपियन मनोज पिंगळे, आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेता व अर्जुन पुरस्कारप्राप्त कॅप्टन गोपाल देवांग, छत्रपती पुरस्कार विजेत्या कॅरम खेळाडू आयेशा मोहम्मद, भारताच्या माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू संपदा शेट्ये, महाराष्ट्राचे डी.एस.ओ. फुटबॉल प्रशिक्षक धीरज मिश्रा, मुंबई पनवेल रसायनी साई केंद्राचे प्रशिक्षक आशिष धायडे, बॅडमिंटन राष्ट्रीय खेळाडू व माजी भारतीय खेळाडू मनदिप सिंग, स्कूलचे प्राचार्य पी. सुभाष, प्राचार्य दिनेशकुमार राणा, निश्चल नायर, सुनंदा मेनन, रथि नायर, भूमिका गर्ग, एस.व्ही.के.एम. स्पोर्ट डायरेक्टर किरण अंचन, संस्था स्पोर्ट मॅनेजर सुशांत कामतेकर, स्कूल क्रीडा संचालक संतोष उदनिया, क्रीडा उपसंचालक अभय कचरे, मोहित जैन, पदाधिकारी, क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक उपस्थित होते. सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षक व खेळाडूंनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. त्यांच्या हस्ते उत्कृष्ट खेळाडूंचा गौरव करण्यात आला.

इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव (Joint Secretary of the Indian Olympic Association) नामदेव शिरगांवकर यावेळी व्यासपीठावरुन बोलतांना म्हणाले, संस्थेचे अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या सक्षम व अभ्यासपूर्ण नेतृत्वाखाली मुकेश पटेल सीबीएसई स्कूलचे कॅम्पस हे खर्‍या अर्थाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅम्पस असून येथील विद्यार्थी हे नशीबवान आहेत. ज्यांना दर्जेदार व आंतरराष्ट्रीय स्तरावरील शैक्षणिक व विविध खेळांच्या बाबतीत असंख्य सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. मेहनत घ्या व जीवनात यशस्वी व्हा, असेही आवाहन केले.

आशियाई क्रीडा (Asian Games) स्पर्धेतील रौप्यपदक विजेता व अर्जुन पुरस्कारप्राप्त कॅप्टन गोपाल देवांग म्हणाले, या शाळेत शिक्षणासह खेळाकडे विशेष लक्ष दिले जाते, ही क्रीडा क्षेत्राच्या दृष्टीने खूपच आनंददायी बाब आहे. विद्यार्थ्यांनी, खेळाडूंनी आपल्या करिअरकडे लक्ष केंद्रित करावे व आपल्या आवडीच्या खेळात, क्षेत्रात नावलौकिक प्राप्त करावा. मी अनेक वर्षे भारतीय बॉक्सिंग टीममध्ये खेळून पदके मिळवली. याच प्रेरणेने सर्व खेळाडूंनी यशस्वी व्हावे.

महाराष्ट्राचे डी.एस.ओ. फुटबॉल प्रशिक्षक धीरज मिश्रा म्हणाले, मी अनेक नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार केले आहेत. अशा यशस्वी खेळाडूंची प्रेरणा घ्या, आपणही मोठे व्हा, आपल्यात भरपूर क्षमता असून त्याचा पुरेपूर उपयोग करा. आपले योगदान द्या, आईवडीलांच्या स्वप्नांना तडा जाऊ देऊ नका, असे आवाहन केले.

शिस्त, परिश्रम, फिजिकल फिटनेसकडे सर्वांनी लक्ष द्यावे. तसेच मोठ्यांचा नेहमी सन्मान करावा. चांगले यश संपादन करावे, असे आवाहन करत या शाळेत, संस्थेत तुमचे भविष्य सुरक्षित असल्याचे प्रतिपादन भारताच्या माजी राष्ट्रीय बॅडमिंटनपटू संपदा शेट्ये (National badminton player Sampada Shetye) यांनी केले. एस.व्ही.के.एम. स्पोर्ट चेअरमन व बी.सी.सी.आय. माजी संचालक नवीन शेट्टी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले, संस्था अध्यक्ष आ. अमरिशभाई पटेल, सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्याकडे मोठी दूरदृष्टी असून खूप कल्पकता आहे. त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी संस्थेचा विस्तार करुन जागतिक दर्जाच्या शैक्षणिक सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध करुन संस्थेमार्फत जागतिक स्तरावरील असंख्य विद्यार्थी आजपर्यंत घडविले आहेत. विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घ्यावी. विद्यार्थ्यांनी सर्व बाबींची प्रेरणा घेवून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडू बनावे.

छत्रपती पुरस्कार विजेत्या कॅरम खेळाडू आयेशा मोहम्मद म्हणाल्या, स्पोर्ट व जिद्दीमुळे खेळाडू आयुष्यात कुठेही कमी पडणार नाहीत. अभ्यासासह स्पोर्टला देखील महत्त्व द्या, जीवनात शिक्षक व प्रशिक्षक यांना कधीही विसरु नका.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com