घोगरे विज्ञान महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा जल्लोष

घोगरे विज्ञान महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचा जल्लोष

धुळे । Dhule प्रतिनिधी

येथील डॉ.पां.रा.घोगरे विज्ञान महाविद्यालयाचे (Dr. P.R. Ghogare College of Science) वार्षिक स्नेहसंमेलन (Annual get-together) जोश-2022 नुकताच उत्साहात झाले. कोविड-19 नंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने अतिशय उत्साहात स्नेहसमेलांचा आनंद विद्यार्थ्यांमध्ये (Students) दिसला.

स्नेहसंमेलनाचे उद्घाटन (Inauguration) नटराज मूर्तिपूजन आणि दीपप्रज्वलन करून संस्थेचे चेअरमन आ. कुणाल पाटील (Chairman MLA Kunal Patil) यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. एस. टी. पाटील, प्रमुख अतिथी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रमोद पाटील हे होते.

यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.व्ही.पाटील, उपप्राचार्य, प्रा.के.एम.बोरसे, स्नेहसंमेलन परीक्षक डॉ.संध्या पाटील, प्रा.निर्मला पाटील, कलामंडल प्रमुख डॉ.मधुसूदन अमृतसागर आदी होते.

स्नेह संमेलनात नृत्य, नाटिका, फॅशन शो, मेहंदी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, कला प्रदर्शन, ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रमात विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

डॉ.एस. टी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. स्नेह संमेलनात सर्व विभागातर्फे क्रिकेट स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ.स्वाती पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.सुधाकर पाटील, प्रा. अनिल पाटील प्रा.सुनील पाटील, प्रा.प्रेमराज पाटील, डॉ.डी.ए. ढाले, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.प्रियंका शिसोदे, प्रा.सविता पाटील, प्रा.पी.ए. मोरे, कौस्तुभ पाटील, अमित पाटील, प्राजक्ता माळी, अंकिता वाघ आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.