आर्णीत गावठी कट्टा

एअर गनसह तरुणाला पोलिसांनी केली अटक
आर्णीत गावठी कट्टा

धुळे । Dhule

तालुक्यातील आर्णी गाव शिवारात गावठी कट्टा (Pistol), एअर गन (Air gun)सह जिवंत काडतूस बाळगणार्‍या तरूणाला तालुका पोलिसांनी सापळा रचत जेरबंद केले. आज मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मुकेश रमेश कोळी (रा.आर्णी) याने देशी बनावटीचा गावठी कट्टा (Gawthi Katta) अवैधरित्या जवळ बाळगलेला असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली.

त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने आर्णी गाव परिसरात शोध घेवून त्याला पकडले. त्यांच्याकडून 20 हजार रूपये किंमतीचा एक देशी बनावटीचा गावठी कट्टा (पिस्टल) (Pistol), 5 हजार रूपये किंमतीची एअर गण, एक हजार रूपये किंमतीची एक जिवंत काडतुस गावठी कट्टयांच्या मॅगझीनमध्ये भरलेली व पाचशे रूपयांचे सिल्वर रंगाचे 2 छर्रे एअरगणमध्ये भरलेले असा एकुण एकूण 26 हजार 500 पाचशे रूपयांचा मुद्येमाल हस्तगत करण्यात आला.

तरूणाविरुध्द धुळे तालुका पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 3,7,25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोना अविनाश गहीवड हे करीत आहोत. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे, पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर काळे, असई सुनिल विंचुरकर, पोहेकॉ प्रविण पाटील, पोकॉ धिरज सांगळे, कुणाल शिंगाणे, नितीन दिवसे, कांतीलाल शिरसाठ, राकेश मोरे यांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com