देशी-विदेशी मद्यासह गावठी कट्टा जप्त ; आरोपी फरार

देशी-विदेशी मद्यासह गावठी कट्टा जप्त ; आरोपी फरार

पिंपळनेर पोलिसांची कामगिरी

पिंपळनेर - वार्ताहर dhule

अवैधरित्या गावठी कट्टा बाळगुन मद्य वाहतुक करणाऱ्या वाहनावर पिंपळनेर पोलीसांची (Pimpalner Police) कारवाई केली. वाहनात असलेल्या गावठी कट्टा तसेच देशी विदेशी मद्यासह ५ लाख ८३ हजार ५६० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि सचिन साळुखे, पोउनि प्रदिप सोनवणे यांच्यासह पथक नवापुर ते पिंपळनेर रस्त्यावर चरणमाळ गावाजवळ नाकाबंदी करीत असतांना नवापुरकडुन पिंपळनेरकडे येणारी कार (क्र.जी.जे. ०२.ओ.सी.४०४३) वरील वाहन चालक यास थांबण्याचा इशारा दिला. त्याने वाहन जागीच सोडुन पळुन गेला.

वाहनाची तपासणी केली असता गावठी बनावटीचा कट्टा व देशी विदेशी कंपनीचा अवैध मद्य साठा मिळुन आला. पाच लाखाची कार, ५८ हजार ५६० रुपये किंमतीची इम्पलेरियल ब्ल्यु कंपनीची विदेशी दारु, टँगो पंच देशी दारु व हायवर्ड ५००० बिअरचे डब्बे व २५ हजारांचा गावठी बनावटीचा कट्टा असा एकूण ५ लाख ८३ हजार ५६० रुपये किंमतीचा जप्त केला. याप्रकरणी चालक व मालक यांचे विरुध्द पोना दत्तु कोळी यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोउनि प्रदिप सोनवणे करीत आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उप विभागीय पोलीस अधिकारी प्रदिप मैराळे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सचिन साळुखे, पोउनि प्रदिप सोनवणे,

पोना दत्तु कोळी, हेमंत सोनवणे, जयकुमार, सोनवणे, विशाल मोहने, सोमनाथ पाटील, रविंद्र सुर्यवंशी, नरेंद्र परेदशी यांनी केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com