धुळ्यात गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूससह एकाला अटक

शहर पोलिसांची कारवाई
धुळ्यात गावठी कट्टा, पाच जिवंत काडतूससह एकाला अटक

धुळे - प्रतिनिधी dhule

शहरात गंभीर गुन्ह्याच्या उद्देशाने भर दिवसा गावठी कट्टा व जिवंत काडतूस घेवून फिरणार्‍यास शहर पोलिसांनी रंगेहात पकडले. त्यांच्याकडून गावठी कट्टयासह पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

या प्रकरणी शहर पोलिसात (police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळे शहरात आगामी नवरात्र व इतर सणोत्सव लोकांना निर्भयपणे साजरे करता यावे, याकरीता गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर कठोर कारवाई करावी, असे आदेश पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील (Superintendent of Police Pravin Kumar Patil) यांनी दिले आहेत. त्यानुसार पोलिसही लक्ष ठेवून आहेत.

सहजिवन नगर शायकीय दुध डेअरी रोड परिसरात एक इसम काही तरी गंभीर अपराध करण्याचे इराद्याने गावठी कट्टा बाळगुन फिरत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. त्यांनी शोध पथकातील अंमलदारांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले. पथकाने शासकीय दुध डेअरी परिसरात सापळा लावला.

सकाळी आठ वाजेच्या सुमारास एक इसम संशयास्पद फिरत असल्याचे दिसताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. रविंद्र ऊर्फ राजु हनुमान वर्मा (वय. 53 रा. सहजिवन नगर, शायकीय दुध डेअरी रोड, धुळे) असे त्याने त्याचे नाव सांगितले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला डाव्या बाजुस एक पिस्टल व पॅन्टच्या उजव्या खिशात पाच जिवंत काडतुस मिळून आले. एकुण 27 हजार 500 रुपये किमंतीचे अनधिकृत शस्त्र जप्त करण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसात भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असई भिकाजी पाटील करीत आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी ईश्‍वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख तसेच पोसई बी.जी. शेवाळे, शोध पथकाचे पोलीस अंमलदार असई भिकाजी पाटील, पोना कुदंन पटाईत, पोकॉ प्रविण पाटील, मनिष सोनगिरे, तुषार मोरे, अविनाश कराड, गुणवंत पाटील, शाकीर शेख यांच्या पथकाने केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com