
दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :
शिंदखेडा तालुक्यातील रहिमपुरे येथे बुधवारी रात्री 9 वाजेच्या सुमारास गॅस सिलेंडरचा स्पोट होवून दोन घरांना लागलेल्या आगीत सुमारे 9 लाख रुपये रोख, दागिने व संसारोपयोगी वस्तु असे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने मनुष्यहानी झाली नाही पण भरुन न निघणारे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होते आहे.
रहिमपूरे गावातील निंबा नथा पाटील व विश्वास गोरख पाटील हे रात्री घराच्या अंगणात झोपले असतांना यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागली.
हा स्पोट इतका भीषण होती की, आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले. पाहता पाहता दोघे घरांची राख रांगोळी झाली.
दागीन्यांसह मोठे नुकसान
या दुर्घटनेत विश्वास पाटील यांच्या घरातील दीड लाख रोकड, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, तीन तोळे सोन्याचे दागिने, पाच ग्रॅम सोन्याची अंगठी, घरघंटी चक्की, फ्रिज, शिलाई मशीन दोन फॅन, फवारणी पंप व घरगुती साहित्य अंदाजे एक लाख 90 हजार व इतर साहित्य एकूण 6,05,800 रुपयांचे जळून नुकसान झाले.
सात लाखांची राख
निंबा पाटील यांच्या घरातील सात लाख रुपये या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने राख झाली. तसेच 24 ग्रॅम सोन्याचे दागिने, टीव्ही, फ्रीज,2 फॅन, हरभरा बियाणे घरगुती वस्तू (साधाणतः किंमत 2,10,000) असे एकूण 10 लाख 73 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे या दोन्ही घरांपैकी णकसखी अंदाजीत किंमत 4 लाख 20 हजार तर दुसर्याची सुमारे 20 लाख 98 हजार 800 एव्हढी असून आगीमुळे पूर्ण नुकसान झाले आहे. या आगीत सर्व शैक्षणिक कागदपत्रेही जळून खाक झालेत.
घटनास्थळी दोंडाईचा व शिंदखेडा नगरपरिषदेचे दोन बंब दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. सदर घटनेचा पंचनामा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, सरपंच, पोलिस पाटील, दीपक ईशी तलाठी यांनी केला.
घटनास्थळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष कामराज निकम, अप्पर तहसीलदार सुदाम महाजन, पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, साहय्यक पोलीस निरीक्षक संतोष लोले, उपनिरीक्षक देविदास पाटील, पोलीस कर्मचारी योगेश पाटील, मंडळ अधिकारी महेशकुमार शास्त्री, दोंडाईचा तलाठी संजीव गोस्वावी, भगत तलाठी यांनी घटनास्थळी पोहचून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.