मनपा स्थायी सभापतींच्या प्रभागातच कचरा पडून

घंटागाडी चालकांना डिझेलसाठी मिळत नाही पैसे, शिवसेनेतर्फे आंदोलनाचा इशारा
मनपा स्थायी सभापतींच्या प्रभागातच कचरा पडून

धुळे Dhule । प्रतिनिधी

ऐन सणासुदीच्या काळातच स्थायी समितीच्या सभापतींच्या (Standing Committee Chair) प्रभागात कचरा (Garbage) पडून आहे. घंटागाडी चालकांना (Ghantagadi drivers) डिझेल (Diesel) भरण्यासाठी पैसे मिळत नसल्याने गाडीच प्रभागात येत नाही. त्यामुळे शिवसेनेने आंदोलनाचा (Shiv Sena's agitation) इशारा दिला आहे.

ऐन सणासुदीच्या काळात गेल्या दिड महिन्यांपासून स्थायी समिती सभापती संजय जाधव यांच्या प्रभागातच भावसार कॉलनी, सम्राट नगर, वैभव नगर तसेच पत्रकार भवन ते दत्त मंदीर गोळीबार टेकडी परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.

मनपा आरोग्य विभागाचे लक्ष्मण पाटील, सॅनेटरी इन्स्पेक्टर रूपेश पवार यांना विनंती करूनही कचरा उचलला गेलेला नाही. या भागात घंटागाडी येत नसल्यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धिरज मराठे यांनी याबाबत मनपा प्रशासनाकडे तक्रार केली. परंतू त्याची दखल घेण्यात आलेली नाही. आज त्यांनी हा कचरा गोणीत भरून फायर स्टेशन येथे उभ्या असलेल्या घंटा गाडीत आणुन टाकला. आरोग्याधिकार्‍यांना याबाबत चौकशी केली.

प्रभाग क्र. 15 चे नगरसेवक व स्थायी समितीचे सभापती संजय जाधव यांनाही याबाबत दुरध्वनीवरुन माहिती दिली.

कचरा ठेका वॉटर ग्रेस कंपनीवर कारवाई केली. सभापतींच्या घरासमोर देखील हिच स्थिती आहे.

सर्व घंटागाडी चालकांना डिझेल भरण्यासाठी पैसेच मिळत नाही. व त्यांना पगारही मिळत नसल्यामुळे गाड्या बंद ठेवल्या आहेत. याबाबत धीरज पाटील यांनी गाडी चालकांशी चर्चा केल्यावर त्यांना डिझेलसाठी पैसेच ठेकेदाराकडून न मिळाल्याने गाड्या बंद ठेवण्याची वेळ आहे.

प्रभागात घटागाडी लवकर सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा धीरज पाटील, अरूण पाटील, धीरज तलवारे, धीरज नंदन, चेतन पाटील, प्रशांत जोशी आदींनी दिला आहे.

कचरा फेकला

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धिरज मराठे यांनी प्रभाग क्र. 15 मध्ये साचलेला कचरा गोणीत भरून फायर स्टेशन येथे उभ्या असलेल्या घंटा गाडीत आणुन टाकला. त्यानंतर आरोग्य विभागाला कचरा कधी उचलणार याबाबत विचारणा केली.

Related Stories

No stories found.