गणरायाचे आज आगमन, खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

गणरायाचे आज आगमन, खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी

धुळे Dhule । प्रतिनिधी

गणेश चतुदर्शीला दि. 31 ऑगस्ट रोजी विघ्नहर्ता गणेशाची स्थापना (Establishment of Vighnaharta Ganesha) करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चौकाचौकात मंडप उभारण्यात आले असून घरोघरी सजावट करण्यात आली आहे. प्रमुख गणेश मंडळांनी गणेश मूर्तीची आधीच नोंदणी (Ganaraya's arrival) करुन ठेवली आहे. उद्या फक्त औपचारीकता म्हणून मिरवणुकीद्वारे गणपतीची मूर्ती ढोल-ताशांच्या निनादांत स्थापन करण्यात येणार आहे. तर आज गणेश चतुदर्शीच्या पूर्वसंध्येला पुजेच्या साहित्यासह सजावटीचे साहित्य खरेदीसाठी (shopping) बाजारपेठेत गर्दी (rush in the market) झाली होती.

गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवाच्या तयारीला वेग देण्यात आला आहे. गणेश मंडळांनी उत्सवाची तयारी पूर्ण केली असून विघ्नहर्त्यांच्या स्वागतासाठी धुळेनगरी सज्ज झाली आहे. उद्या दि.31 रोजी गणेश चतुदर्शीला लाडक्या गणरायाची स्थापना करण्यात येणार आहे. दहा दिवसांच्या गणेशोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या पार्श्वभूमीवर चौकाचौकात मंडप सजले असून गणेश मंडळांनी उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. आरास, देखावे तयार करण्याला वेग देण्यात आला असून पहिल्याच दिवशी आरास नागरिकांसाठी खुली करण्याचा प्रयत्न केला जात आहे

उत्सवाच्या पूर्वसंध्येला आज बाजारपेठेत गणेशमूर्तींसह पुजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी झाली होती. शहरातील फुलवाला चौक, संतोषीमाता चौक, दत्तमंदीर यासह अन्य ठिकाणी गणेश मूर्ती विक्रेत्यांनी तात्पुरती दुकाने थाटली आहेत. बाजारपेठेत विविध आकारातील रंगातील गणेशमूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यात मुंबईच्या लालबागच्या राजापासून ते दगडूशेठ हलवाई, कृष्णावतार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशातील गणेशमूर्तीचा समावेश आहे. त्याशिवाय जास्वंद फुल, पान, शंख, चौरंग, सूर्यफुल अशा प्रकरातील विविधारंगी गणेश मूर्तीही विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 50 रुपयांपासून ते 51 हजारांपर्यत गणेश मूर्ती बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत.

शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक व्यवस्था अन्य मार्गाने वळविण्यात आली आहे. ठिकठिकाणी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी बंदोबस्तांसाठी तैनात करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com