दरोड्यातील फरार आरोपीला बेड्या; गांजासह तरुण ताब्यात

धुळे तालुका पोलिसांची दुहेरी कामगिरी: तरूणासह दोघांवर गुन्हा
दरोड्यातील फरार आरोपीला बेड्या; गांजासह तरुण ताब्यात

धुळे । Dhule प्रतिनिधी

तालुका पोलिसांनी (police) काल दुहेरी कामगिरी केली आहे. पाच वर्षापासून फरार (Absconding) असलेल्या दरोड्यातील आरोपीला जेरबंद (Accused of robbery arrested) करण्यात आले. तर शिरूड चौफुलीवर गांजा बाळगणार्‍या (Cannabis carriers) तरुणाला देखील ताब्यात घेतले आहे.

धुळे तालुयातील हेंकळवाडी येथे पुणे जिल्ह्यातील खेडगांव येथे राहणारे दत्तात्रय मारोती देशमुख हे दि. 4 नोव्हेंबर 2017 रोजी ऊसतोड मजूर (Sugarcane labore) घेण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांना दहा जणांनी धक्काबुक्की करीत त्यांच्याकडील रोकड व मोबाईल (Cash and mobile) असा एकूण 7 लाख 9 हजार 500 रुपयांचा ऐवज लुटला होता. याप्रकरणी तालुका पोलिसात 5 डिसेंबर 2017 रोजी गुन्हा (crime) दाखल झाला होता. या गुन्ह्यातील आरोपी कलिम मॅनेजर भोसले (रा.हेंकळवाडी) हा पाच वर्षापासून फरार (Absconding) होता. दरम्यान, दि.13 जून रोजी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना कलिम भोसले हा हेंकळवाडी परिसरात आल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून फरार आरोपी कलिम भोसले याला पकडले (arrested).

गांजासह तरूण ताब्यात-

दुसरी कारवाई धुळे तालुक्यातील शिरूड चौफुली येथे करण्यात आली. काल दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास शिरुड चौफुलीवर हितेश राजूलाल भूजवा (वय 21) या तरुणाला तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याजवळील रेक्झीन बॅगमध्ये 10 हजार 900 रुपये किंमतीचा ओला गांजा (Cannabis carriers) मिळून आला. चौकशीत हितेश भूजवा हा वडजाई रोडवरील शिवाजी नगरातील रहिवासी असून मयूर राजेंद्र राणा उर्फ काका राणा यांच्या सांगण्यावरुन तो हा माल घेवून आल्याची त्याने कबुली दिली. पीआय दत्तात्रय शिंदे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोकॉ धीरज सांगळे यांच्या फिर्यादीवरुन मयुर राणा व हितेश भूजवा या दोघांवर गुन्हा (crime) दाखल झाला आहे.

या दोन्ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकार प्रदीप मैराळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोसई सागर काळे, पोसई प्रल्हाद चव्हाण, असई सुनिल विंचुरकर, हेकॉ प्रवीण पाटील, पोकॉ कुणाल शिंगाणे, राकेश मोरे, धीरज सांगळे, नितीन दिवसे, कांतिलाल शिरसाठ, पोना अविनाश गहिवड, राकेश मोरे यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com