पिस्टल बाळगणार्‍यासह फरार आरोपीला बेड्या

पिस्टल बाळगणार्‍यासह फरार आरोपीला बेड्या

धुळे Dhule । प्रतिनिधी

स्थानिक गुन्हे शाखेने (Local Crime Branch) दुहेरी कामगिरी केली आहे. शहरात अवैधरित्या गावठी कट्टा (Illegally Gawthi Katta) व जिवंत काडतूस बाळणार्‍या तरुणाला अटक (youth was arrested) करण्यात आली. तर तीन वर्षापासून फरार (Absconding) असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीलाही (Accused) जेरबंद करण्यात आले. एलसीबीच्या या कामगिरीचे पोलिस अधिक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतूक केले आहे.

शहरातील कोळवले नगरात राहणारा रितीक उर्फ निक्की अमरसिंग पंजाबी (वय 22) हा अवैधरित्या गावठी कट्टा (Illegally Gawthi Katta) बाळगुन असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी त्याचा शोध घेण्यासाठी पथकाला रवाना केले. पथक शोध घेत त्याला दंडेवालाबाबा नगर परिसरातून ताब्यात घेतले. गावठी कट्टयाबाबत विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी हिसका दाखविताच त्याने दंडेवालाबाबा नगरातील हुडको कॉलनी शेजारील नाल्यालगत असलेल्या श्री कृष्णा पार्कीग यार्डचे कंपाऊंड वॉलच्या शेजारील दगडाखाली लपवून ठेवलेली 25 हजार रुपये किमतीची गावठी बनावटीची पिस्टल (गावठी कट्टा) (Illegally Gawthi Katta) व एक हजार रुपये किमतीची जिवंत काडतूस काढून दिली. याप्रकरणी पोना योगेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरुन मोहाडी पोलिस ठाण्यात रितीक उर्फ निक्की अमरसिंग पंजाबी यांच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याच्यावर शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये तब्बल पाच गुन्हे (crime) दाखल आहेत. त्यात देवपूर 2, मोहाडी उपनगर 2 तर आझादनगर पोलिस ठाण्यात 1 गुन्हा दाखल आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सपोनि प्रकाश पाटील, पोसई बाळासाहेब सूर्यवंशी, पोसई योगेश राऊत, पोहेकॉ प्रकाश सोनार, संदीप सोनार, पोना सागर शिर्के, पंकज खैरमोडे यांच्या पथकाने केली.

फरार आरोपीला पकडले-

धुळे तालुका पोलिस ठाण्यात दि. 23 मार्च 2019 रोजी दाखल एका गुन्ह्यातील आरोपी तीन वर्षापासून फरार (Absconding) होता. चितोड येथील रहिवासी वंदनाबाई भगवान मोरे (वय 48) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चितोड गावात वंदनाबाई यांच्या घराजवळ आरोपींनी (Accused) जमावासह एकत्र येत वंदनाबाई यांना शिविगाळ करुन डोक्यावर कुर्‍हाडीने मारुन जखमी केले होते. तसेच त्यांच्या मुलासही डोक्यावर मारुन जखमी केले होते. यातील चार आरोपींना यापुर्वीच अटक (Accused) करण्यात आली होती. परंतु, दिनेश उत्तम सोनवणे (वय 28 रा.चितोड ता.धुळे) हा तेव्हापासून फरार होता.

त्याचा शोध घेत असताना निरीक्षक हेमंत पाटील यांनी माहिती मिळाली की, सदर आरोपी दिनेश सोनवणे हा त्याच्या मुळ ठिकाणचा पत्ता बदलून नकाणे तलाव परिसरातील एका टेकडीवर झोपडी करुन रहात आहे. त्यानुसार त्यांनी पोसई सूर्यवंशी यांचे पथक तयार करून रवाना केले. पथकाने पहाटे चार वाजता नकाणे तलाव परिसरातील झोपड्यांमध्ये आरोपीची खात्री करत असताना आरोपी दिनेशला त्याचा सुगावा लागला. त्यामुळे त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पथकानेही त्याला शिताफिने पकडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com