आग्र्याहून हातात मशाल घेऊन निघालेले 300 मावळे धुळ्यात दाखल

356 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक घटनेला पुन्हा उजाळा
आग्र्याहून हातात मशाल घेऊन निघालेले 300 मावळे धुळ्यात दाखल

धुळे - प्रतिनिधी dhule

छत्रपती शिवाजी महाराजांचे (Chhatrapati Shivaji Maharaj) पायदळ प्रमुख नरवीर पिलाजीराव गोळे यांचे 13 वे वंशज ॲड.मारुतीराव आबा गोळे यांच्या नेतृत्वाखाली 300 मावळे शिवज्योत घेऊन आग्र्याहून निघाले असून राजगड पायी जात आहेत.

आग्रा (Agra) येथून छत्रपती शिवाजी महाराजानी आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर औरंगजेबाच्या (Aurangzeb) हातावर तुरी देऊन बाळराजे छ.संभाजी महाराजांसह सुटका करून घेतली. या ऐतिहासिक घटनेला 356 वर्ष पूर्ण झालीत. यानिमित्त गरुड झेप मोहिमे अंतर्गत ही पायी मशाल यात्रा काढण्यात आली आहे.

यात्रेचे धुळ्यात आज बुधवारी महाराणा प्रताप (Maharana Pratap) स्मारकाजवळ आगमन झाले. स्मारक समितीचे अध्यक्ष अजित राजपूत, शिवराणा ग्रुपचे तेजपाल गिरासे यांनी त्यांचे स्वागत केले. यात्रेतील ॲड.गोळे, दिग्विजय जेडे, विलास मोरे, आप्पा कोळी यांचा प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. यावेळी जगदीश राणा, मनजीत सिसोदिया, ॲड.शैलेश राजपूत, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com