धुळ्यात 1 रोजी मोफत महाआरोग्य शिबीर

स्व. चंद्रकांत केलेंच्या जयंतीनिमित्त आयोजन, विशाल केले यांची माहिती
धुळ्यात 1 रोजी मोफत महाआरोग्य शिबीर

धुळे । Dhule। प्रतिनिधी

चंद्रकांत केले मेडीकल अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशनतर्फे (Chandrakant Kele Medical and Research Foundation) संस्थापक चेअरमन तथा मनपाचे माजी स्थायी समिती सभापती स्व चंद्रकांत केले (Chandrakant Kele) उर्फ केले काका यांच्या जयंतीनिमित्त फाऊंडेशनतर्फे गोर-गरीब व गरजुंसाठी महाआरोग्य शिबिराचे (General Health Camp) आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचा शुभारंभ दि. 1 एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजता देवपूरातील नेहरू चौकातील संस्थेच्या आवारात होणार असल्याची माहिती फाऊंडेशनचे विशाल केले यांनी पत्रकार परिषदेत केले.

यावेळी राजेंद्र खानकरी, आसिफ पटेल आदी उपस्थित होते. आपणही समाजाला काही देणे या हेतूने स्व. चंद्रकांत केले यांनी चंद्रकांत केले मेडीकल अ‍ॅण्ड रिसर्च फाऊंडेशन या ट्रस्टची स्थापना केली.

या ट्रस्टच्या माध्यमातून काशिनाथ सखाराम केले डायलेसीस सेंटर (Kashinath Sakharam Kele Dialysis Center) पाच वर्षापुर्वी सुरू करण्यात आले. या प्रकल्पातंर्गत गेल्या पाच वर्षात 30 हजार जास्त रूग्णांचे यशस्वीरित्या डायलेसिस करण्यात आले आहे. गरीब व गरजुंकरीता संस्थेमार्फत शहरात सेवाभावी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल (Sevabhavi Multi Specialty Hospital) सुरू करावे, अशी केले काकांचे स्वप्न होते. ते आता संस्थेचे ध्येय झाले आहे. त्यादृष्टीने संस्थेची वाटचाल सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून व केले काकांचा आदर्श डोळासमोर ठेवून या महाआरोग्य शिबिराचे (Maha Arogya Shibir) आयोजन करण्यात आले असल्याचेही विशाल केले यांनी यावेळी सांगितले.

शिबिरार्थ्यांसाठी मंडप टाकण्यात आला असून कुलर व पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. शिबिरात ट्रस्टमार्फत रक्त तपासणी, ईसीजी, ऑक्सीजन तपासणी मोफत असणार आहे. तसेच आवश्यक ती औषधे (Medications) देखील मोफत दिली जाणार आहे. 2डी-इको तपासणी 50 टक्के सवलती दरात असल्याचेही त्यांनी सांगितले. आहे. गरजुंनी लाभ घ्यावा, असे आवाहन फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल केले, विश्वस्त मदनलाल सुराणा व विश्वस्त मंडळाने केले आहे.

तज्ज्ञ डॉक्टर देतील सेवा

शिबिरात किडनी विकार तज्ञ डॉ. जयेश वाघुळदे, डॉ. निखिल शिंदे, हद्रोग तज्ञ डॉ. हर्षल सुराणा, शल्यचिकीत्सक डॉ. माधुरी बाफना, डॉ. विपूल बाफना, डॉ. निशिगंध पाटील, गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. निखिल शिरोळे, वैद्यकीय तज्ञ डॉ. संजय संघवी, डॉ. गिरिष वडगावकर, जिनेंद्र जैन, डॉ. तुषार चव्हाण, डॉ. भुपेश पाटील, स्त्रीरोग तज्ञ डॉ. वैशाली पाटील, डॉ. शितल पाटील, बालरोग तज्ञ डॉ. संजय जोशी, डॉ. अभिनय दरवडे, डॉ. सिध्दांत पाटील, डॉ. सईद पटेल, युरोलॉजिस्ट डॉ. आनंद जोशी, अस्थीरोग तज्ञ डॉ. अभय शिनकर, डॉ. ज्योतीकुमार बागुल व त्वचारोग तज्ञ डॉ. चेतन राजपुत, डॉ. भुषण चौधरी हे सेवा देणार आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com