धुळे जिल्ह्यात 14 लाख लाभार्थ्यांना मोफत धान्य

धुळे जिल्ह्यात 14 लाख लाभार्थ्यांना मोफत धान्य

धुळे । Dhule

केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेतंर्गत सर्व लाभार्थ्यांना जानेवारी 2023 पासून पुढील एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला असून धुळे जिल्ह्यात 14 लाख 64 हजार 810 रेशनकार्ड लाभार्थ्यांना या योजनेतंर्गत मोफत धान्य मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ यांनी दिली आहे.

धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत तीन लाख एक हजार 802 रेशनकार्ड धारक असून त्यामध्ये अंत्योदय योजनेतंर्गत 75 हजार 15 व प्राधान्य कुटुंब योजनेतील दोन लाख 26 हजार 787 असे एकूण तीन लाख एक हजार 802 पात्र शिधापत्रिका धारकांमधील एकूण 14 लाख 64 हजार 810 पात्र लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळणार आहे.

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना तीन रुपये प्रति किलो दराने तांदूळ, दोन रुपये प्रति किलो दराने गहू व एक रुपये प्रति किलो या दराने भरडधान्य उपलब्ध करून देण्यात येत होते. कोरोना काळात पंतप्रधान गरीब कल्याण योजनेतंर्गत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य गटातील रेशन कार्डधारकांना दरमहा रेशन दुकानातून मोफत अन्नधान्याचे वितरण करण्यात येत होते.

कोरोना काळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर 2022 पासून बंद करण्यात आले असून आता या रेशनकार्डधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत मोफत अन्नधान्य दिले जाणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही तक्रार असल्यास तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत, जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे श्री. मिसाळ यांनी कळविले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com