बनावट मुखत्यारपत्राव्दारे फसवणूक, दहा जणांवर गुन्हा

बनावट मुखत्यारपत्राव्दारे फसवणूक, दहा जणांवर गुन्हा

धुळे । Dhule प्रतिनिधी

बनावट मुखत्यारपत्राव्दारे (fake power of attorney) प्लॉट खरेदी करून एकाची फसवणूक (Cheating )केल्याप्रकरणी दहा जणांवर गुन्हा (Crime) दाखल झाला आहे.

याबाबत संजय रंगलाल अग्रवाल (वय 49 रा. सोनार गल्ली, वरचे गाव, शिरपूर) यांनी धुळे शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले आहे की, भटू धुडकू पाटील (रा. बांमभुरे प्र.नेर पो. खंडलाय ता. धुळे), दीपक शिवाजी शिरसाठ (रा. लोणखेडी) व निसार इब्राहीम शाह (रा. सोनगीर) यांनी फिर्यादीचे वडील रंगलाल ग्यारसिलाल अग्रवाल हे दि. 24 जुलै 2007 रोजी मयत झालेले असतांना त्यांच्या नावाने तोतया इसम उभा करून खोटे व बनावट जनरल मुखत्यार पत्र तयार केले. त्याआधारे प्रकाश तुळशीराम साखला (रा. तुलसी निवास, आग्रा रोड, धुळे) याने स्वतःच्या नावे प्लॉट करून घेतला.

त्यासाठी साक्षीदार म्हणून नंदकिशोर हरनारायण पिपलवा (रा. गल्ली नं. 4, धुळे) व विकास धर्मा गुुंडेवाल (रा. गल्ली नं. 8, देवपूर) यांनी मदत केली. त्यानंतर सदरचा प्लॉट प्रकाश तुलसिराम साखला याने शरद बुधाजी सैंदाणे व पुष्पलाल बाबुराव खैरनार (रा. गल्ली नं. 2, सुभाष नगर, जुने धुळे) यांना विक्री करून त्यासाठी साक्षीदार म्हणून आविदा शेख शरीफ व अफजल हुसेन अब्दुल हाफिज रा. धुळे यांनी मदत केली. वरील दहाही जणांनी कट कारस्थान करून बनावट मुखत्यार पत्राच्या आधारे फिर्यादीच्या वडीलांच्या नावे असलेला मौजे मोहाडी प्र. लळींग येथील स.नं 158/2 पैकी प्लॉट नं. 89 चे क्षेत्र 356.2 चौरस मीटरचा बखळ प्लॉट खरेदी करून फसवणूक केली.

हा प्रकार 9 जानेवारी 2017, दि. 21 फेब्रुवारी 2017 व दि. 17 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी शहरातील दुय्यम निबंधक कार्यालय वर्ग 2 येथे घडला. त्यावरून वरील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास सपोनि दादासाहेब पाटील करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com