सार्वेत चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार, आरोपीला अटक

सार्वेत चार वर्षाच्या बालिकेवर बलात्कार, आरोपीला अटक

धुळे ।dhule प्रतिनिधी

शिंदखेडा तालुक्यातील सार्वे शिवारात चार वर्षाच्या बालिकेवर (Four-year-old girl) एकाने बलात्कार (raped) केल्याची संतापजनक घटना काल दि.11 रोजी दुपारी घडली. याप्रकरणी एकावर नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्याला (accused arrested) अटक केली आहे.

याबाबत बालिकेच्या वडिलांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.11 मे रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास त्यांच्या चार वर्षाच्या मुलीस गावातील खंडु इंदल मोरे याने गावातील नदीच्या पलीकडे असलेल्या झाडाझुडपात नेवुन तिच्यावर बलात्कार केला.

नरडाणा पोलीस ठाण्यात खंडु मोरे विरोधात भादंवि कलम 376, 376 अ, ब, सह लैंगिक अत्याचार बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4,5 एम.यु. प्रमाणे गुन्ह्या दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोज कुवर हे करीत आहेत. पोलिसांनी खंडू मोरे यास अटक केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com