विविध घटनेत चार जणांची आत्महत्या

विविध घटनेत चार जणांची आत्महत्या

धुळे । dhule। प्रतिनिधी

जिल्ह्यात विविध घटनेत चार जणांनी (Four people) गळफास घेवून आत्महत्या (committed suicide) केली आहे. त्यात महिलेचाही समावेश असून याबाबत संबंधीत पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.

अहिल्यापूर (ता.शिरपूर) येथील महेश साहेबराव आखाडे (वय 19) या तरूणाने काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास गळफास घेतला. त्यास आजोबा सुकदेव जावळे यांनी कॉटेज रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत थाळनेर पोलिसात नोंद झाली असून पुढील तपास पोना धनगर करीत आहेत. तसेच साक्री शहरातील ओमशांती नगरात राहणार्‍या नसरीबीन इस्माईल पठाण (वय 30) या महिलेने घरात झोका करण्यासाठी बांधलेल्या दोरीने गळफास घेतला. दि.25 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. तिला साक्री ग्रामीण रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. साक्री पोलिसात नोंद झाली आहे.

तसेच अनकवाडी (ता.धुळे) येथील रहिवासी शिवाजी शांताराम कोल्हे (वय 40 रा.अनकवाडी) याने काल दि.26 रोजी दुपारी राहत्या घरात लोखंडी पाईपला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. त्याला ग्रामस्थांच्या मदतीने खाली उतरवून जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. तालुका पोलिसात नोंद झाली असून तपास पोना गहिवड करीत आहेत. याबरोबरच विवेक पुंडलिक पवार (वय 35 रा. विवेकानंद नगर, गोंदुर रोड, धुळे) या तरूणाने घरात बेडरूमधील पंख्याला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. काल पहाटे पाच वाजेच्या सुमारास तो गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याला हिरे महाविद्यालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करीत मृत घोषित केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com