धुळ्यात पुन्हा आढळले कोरोनाचे चार रुग्ण

धुळ्यात पुन्हा आढळले कोरोनाचे चार रुग्ण

धुळे ।Dhule । प्रतिनिधी

धुळ्यात कोरोना महामारीने (Corona epidemic) पुन्हा डोके वर काढले असून गुरुवारी चार कोरोना बाधित (Four corona interrupted) आढळून आलेत.

खाजगी लॅबचा चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यात देवपूरातील सुयोग नगरातील 38 वर्षीय पुरुष, नकाणे रोडवरील गणेश नगरातील 45 वर्षीय पुरुष, जयहिंद कॉलनीतील 30 वर्षीय पुरुष आणि जुने धुळ्यातील सुभाष कॉलनीतील 87 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 45 हजार 919 बाधित आढळून आले आहेत. तर 672 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यात महापालिका क्षेत्रात 264 आणि ग्रामीण भागात 408 जणांचा समावेश आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com